Chinchwad Vidhan Sabha Election Result 2024 Live: चिंचवडच्या आखाड्यात महायुतीचे शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल कलाटे अशी दुरंगी लढत वाटत असली तरी, अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर कुणाचा ताप वाढविणार, याविषयी चर्चा रंगली होती. मात्र अशातच आज मोजणीच्या पहिल्या फेरीपासून शंकर जगताप आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अखेर चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचेभाजपाचे उमेदवार शंकर जगताप हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांचा पराभव केला आहे. जगताप यांच्या विजयानिमित्त थेरगाव परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे. डीजेचा दणदणाट करून जल्लोष साजरा केला आहे.
थेरगाव येथील स्व. शंकरराव गावडे कामगार भावनांमध्ये भावनांमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीचा निकाल येण्यास सकाळी पावणेदहा वाजले. सुरुवातीला मतमोजणीचा वेग कमी होता. मात्र, नंतर तो वाढला. प्रत्येक फेरीला निकालाची उत्सुकता कायम होती. पावणेदोन पर्यंत २४ फेऱ्या पूर्ण झाल्या. पहिल्या फेरीपासूनच शंकर जगताप आघाडीवर होते तर दुसऱ्या क्रमांकावर राहुल कलाटे होते. अधिकृत आकडेवारी अजून जाहीर करण्यात आलेली नाही.
इथं क्लिक करा >>महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४
कार्यकर्त्यांचा जल्लोष
जगताप यांची पहिल्या फेरीपासूनच आघाडी कायम होती. विजय घोडदौड सुरू असतानाच दीड वाजल्यापासून कार्यकर्त्यांची मतदान मोजणी केंद्रावर गर्दी होऊ लागले. कार्यकर्त्यांनी जय श्रीराम म्हणत जल्लोष केला.
बंडामुळे आघाडीचा पराभव
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होती. महायुतीचे बंडखोर नाना काटे, मोरेश्वर भोंडवे यांचे बंड शमले; पण, भोईर यांची बंडखोरी रोखण्यात अपयश आले, असे असले तरी महायुतीतील घटक पक्षांची एकजूट करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना यश आले. सुरुवातीस महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी चुरस होती. मात्र, महायुतीतील बंड ९९ टक्के थंड करण्यात नेत्यांना यश आले, ही जमेची बाजू जगताप यांना विजय मिळवून देणारी होती.