पिंपरी चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेत महापौर निवड झाल्यावर एक वेगळीच समस्या उद्भवलेली बघायला मिळाली.निवडणुकीच्यावेळी अतिउत्साही कार्यकर्त्यांनी उधळलेल्या भंडाऱ्यामुळे अनेक नागरिक घसरले. अखेर अग्निशमन दलाने हा रस्ता धुवून काढल्यावर अपघातांचे सत्र थांबले.
पिंपरी-चिंचवडच्या href="http://www.lokmat.com/topics/mayor/">महापौरपदी भाजपाचे राहुल जाधव यांची निवड झाली आहे.अर्थात महापालिकेत भाजपचे बहुमत असल्यामुळे भाजपचा महापौर होणे उघड होते.त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी पूर्ण तयारी केली होती.निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या क्षणी ढोल ताशे वाजायला सुरुवात झाली आणि कार्यकर्त्यांनी भंडाऱ्याची उधळण सुरु केली. भरपूर भंडारा उधळयामुळे महापालिकेसमोर असणाऱ्या गाड्या, रस्ते माखून गेले होते. नेमकी त्याचवेळी पावसाची सर येऊन गेली आणि सर्वत्र चिखल झाला. या चिखलात काही गाड्या घसरल्या तर काही नागरिकही पडले. सुदैवाने कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. अखेर या चिखलामुळे अपघात होऊ लागल्याने तुकारामनगर अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. आणि त्यांनी संपूर्ण रस्ता पाण्याने धुवून काढला आणि अपघातांची मालिका थांबली.