शहरात स्वातंत्र्यदिनाचा जागर
By admin | Published: August 18, 2015 11:48 PM2015-08-18T23:48:18+5:302015-08-18T23:48:18+5:30
शहरामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. अनेक संस्थांनी विविध उपक्रम राबविले
पिंपरी : शहरामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. अनेक संस्थांनी विविध उपक्रम राबविले. काही ठिकाणी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
चावला माध्यमिक विद्यालयबीशिसत्व प्रतिष्ठानच्या शरदनगर, चिंचवड येथील के. जे. चावला माध्यमिक विद्यालयात अध्यक्ष अतुल सोडेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. अजय कुंभार, गोकुळ गायकवाड, लहू कांबळे, विष्णू गायकवाड उपस्थित होते.
मनपा म्हेत्रेवाडी शाळा
महापालिकेच्या म्हेत्रेवाडी शाळा क्रमांक ९२ मध्ये नगरसेवक दत्ता साने यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी नगरसेविका वनिता थोरात, नगरसेवक सुरेश म्हेत्रे, माणिक म्हेत्रे, लालासाहेब मोरे, अलका मोरे, शिक्षिका नीता उबाळे, रेखा पुरोहित, स्नेहल मोरे, बाबा गोरे, संतोष जंगम उपस्थित होते. सूत्रसंचालन मीनाक्षी भारती यांनी केले. स्नेहल मोरे यांनी आभार मानले.
मंजिरीबाई प्राथमिक विद्यालय, दिघी
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मंजिरीबाई प्राथमिक विद्यालयात अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेविका आशा सुपे, दत्ता घुले, मुख्याध्यापक संजय दंडवते उपस्थित होते.
श्री संत तुकाराम महाराज विद्यालय
चिखली येथील श्री संत तुकाराम महाराज विद्यालयात ढोल, ताशे व लेझीमच्या साह्याने घोषणा देत जनजागृतीचा उद्देश समोर
ठेवून प्रभातफेरीने ध्वजवंदन
सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे सचिव गोविंद दाभाडे, संभाजी शिरसाट, नगरसेवक दत्ता साने, राजाराम मोरे, मंगेश मोरे, उपस्थित होते. सूत्रसंचालन काळुराम पवार यांनी केले.
प्रज्ञा विकास हौसिंग सोसायटी
विठ्ठलनगरमधील प्रज्ञा विकास हौसिंग सोसायटी, जयश्री हनुमान हौसिंग सोसायटी, भीमाई सहकारी हौसिंग सोसायटीमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला. या वेळी नगरसेवक राहुल भोसले यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.