पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. तळवडे : येथील रुपीनगर येथे ज्ञानदीप विद्यालय, व्यसनमुक्त युवकसंघ रुपीनगर, पतंजली योग समिती, आरोग्य विभाग पिंपरी- चिंचवड महापालिका यांच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने माळरानावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात ज्ञानदीप विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पतंजली योग समितीचे व व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ज्ञानदीप विद्यालयात कार्यक्रमज्ञानदीप विद्यालय येथे महात्मा गांधी, तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष शांताराम भालेकर, विद्यालयाचे सभापती सुधाकर दळवी, व्यसनमुक्त युवक संघाचे भानुदास वैराट, पतंजली योग समितीचे साहेबराव गारगोटे, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत भसे, तसेच आरोग्य निरीक्षक शांताराम माने उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी केला परिसर स्वच्छतळवडे, येथील रुपीनगर शिक्षण मंडळाच्या राजा शिवछत्रपती विद्यालयात विद्यार्थ्यांनी विद्यालय परिसराची साफसफाई केली. यानिमित्त महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीसवाटप करण्यात आले. या प्रसंगी बोलताना माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोवर्धन चौधरी यांनी मार्गदर्शन केले. रुपीनगरमध्ये अभियानतळवडे : रुपीनगर येथील ‘स्वयंभू युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे आौचित्य साधून प्रतिमापूजन व रुपीनगर येथील परिसरात स्वच्छता अभियान राबविले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंत पतंगे यांनी रोगराईला प्रतिबंध करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छतेलाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. (वार्ताहर)
महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहरामध्ये स्वच्छता अभियान
By admin | Published: October 03, 2015 1:20 AM