शिक्षिका, विद्यार्थिनींसाठी तक्रार पेटीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:12 AM2018-10-06T02:12:01+5:302018-10-06T02:12:32+5:30
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, महिला सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनी व शिक्षिका नाव पुढे येईल
सांगवी : शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थिनींसाठी तक्रार पेट्या लावण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. अत्याचार आणि अन्यायाविरोधात शिक्षिका आणि विद्यार्थिनी तक्रार करण्यास पुढे येतील. त्यामुळे तक्रारपेट्या त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, महिला सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनी व शिक्षिका नाव पुढे येईल या भीतीने तक्रार करायला पुढे येत नाहीत, हे लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडमधील विविध शाळा, कॉलेजमध्ये महिलांच्या तक्रारपेटीसाठी शाळा, कॉलेज प्रशासन व पोलीस प्रशासनाची मदत व्हावी या हेतूने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवी परिसरातील बा. रा. घोलप महाविद्यालयातील शिक्षिका व विद्यार्थिनींच्या तक्रारपेटीसाठी भाजपा विद्यार्थी आघाडी चिंचवड विधानसभेच्या वतीने प्राचार्य श्रीकृष्ण माळी, बाळासाहेब झगडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष ललित म्हसेकर, सुशांत रोकडे, प्रदीप जाधव, आदित्य कांबळे, अजय मारुती उपस्थित होते.