पाणीपुरवठ्याबाबत मांडल्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:16 AM2018-10-06T02:16:15+5:302018-10-06T02:16:38+5:30
साई सिद्धनगर, सिद्धेश्वर कॉलनी, सत्यनारायण हाउसिंग सोसायटीत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. येथे २० वर्षे जुनी मलनिस्सारण आणि सांडपाण्याची वाहिनी आहे.
पिंपरी : प्रभाग क्र. ५ गवळीनगर परिसरात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका अधिकारी आणि नागरिकांची सभा झाली. गवळीनगर परिसरातील महिलांनी या वेळी अधिकाऱ्यांसमोर तक्रारी मांडल्या. गवळीनगर येथे सभा झाली. नगरसेविका प्रियंका बारसे, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर, जलनिस्सारण विभागाचे अमोल शेलार, अनिता घाणेकर, संगीता शेलार, सुदाम देवरे, प्रकाश जोशी, भारती सावंत, सादिका मुजावर, सुषमा खर्चे, सविता चव्हाण, सुषमा कुंभार, मंदाकिनी गोगावले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
साई सिद्धनगर, सिद्धेश्वर कॉलनी, सत्यनारायण हाउसिंग सोसायटीत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. येथे २० वर्षे जुनी मलनिस्सारण आणि सांडपाण्याची वाहिनी आहे. ती बदलून नवीन वाहिनी टाकण्याची मागणी करण्यात आली. नूरमोहल्ला परिसरात पाण्याऐवजी नळातून केवळ हवा येते, पाणीपुरवठा वेळेत होत नाही, अशी तक्रार करण्यात आली. या परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्यात येईल. क्रांतीसूर्यनगर, पोटे चाळ, त्रिमूर्ती कॉलनी, नूरमोहल्ला, तुकाई नगर परिसरात नवीन ड्रेनेजलाइन टाकण्यात येणार आहे. १५ आॅक्टोबरपर्यंत हे काम सुरू होणार असल्याचे अधिकाºयांनी या वेळी सांगितले. नगरसेविका प्रियंका बारसे यांनी आभार मानले.