‘प्रलंबित मागण्या पूर्ण करा’; बजाज आॅटोच्या कामगारांचे आकुर्डीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 03:46 PM2018-01-29T15:46:14+5:302018-01-29T15:49:16+5:30

बजाज आॅटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण येथील बडतर्फ कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे. तसेच प्रलंबित वेतनकरार करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी २९ जानेवारी पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय विश्वकल्याण कामगार संघटनेने घेतला आहे.

'Complete Pending Requests'; Bajaj Auto workers agitation in Akurdi | ‘प्रलंबित मागण्या पूर्ण करा’; बजाज आॅटोच्या कामगारांचे आकुर्डीत आंदोलन

‘प्रलंबित मागण्या पूर्ण करा’; बजाज आॅटोच्या कामगारांचे आकुर्डीत आंदोलन

Next
ठळक मुद्देआकुडीर्तील शहीद दत्तात्रय पाडाळे यांच्या पुतळ्याजवळ संघटनेचे आंदोलनकंपनी व्यवस्थापनास यापूर्वीच दिले आंदोलन करणार असल्याबाबतचे पत्र

पिंपरी : बजाज आॅटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण येथील बडतर्फ कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे. तसेच प्रलंबित वेतनकरार करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी २९ जानेवारी पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय विश्वकल्याण कामगार संघटनेने घेतला आहे. आकुडीर्तील शहीद दत्तात्रय पाडाळे यांच्या पुतळ्याजवळ संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले आहे.
आंदोलनात अध्यक्ष दिलीप पवार तसेच जनरल सेक्रेटरी बाळासाहेब थोरवे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले आहेत. कामगारांच्यावतीने या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. आंदोलन करणार असल्याबाबतचे पत्र कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब थोरवे यांनी कंपनी व्यवस्थापनास यापूर्वीच दिले आहे. 
बजाज आॅटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण युनिटमध्ये विश्वकल्याण कामगार संघटना कार्यरत आहे. एप्रिल २०१६ ते २०१९ या कालावधीतील वेतनकराराबाबत कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात चर्चेच्या फेऱ्या झाल्या. मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून समाधानकारक निर्णय घेतला जात नाही. मान्यताप्राप्त संघटनेला विचारात न घेता, परस्परपणे चाकण येथील कामगारांना वेतनवाढ देण्याचा एकतर्फी निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला, असा कामगारांचा आरोप आहे. वेतनवाढीचा निर्णय मान्यताप्राप्त कामगार संघटनेशी विचारविनिमय करून घ्यावा. त्याचबरोबर बडतर्फ कामगारांना कंपनीने पुन्हा कामावर रूजू करून घ्यावे, या मागण्यांकडे आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: 'Complete Pending Requests'; Bajaj Auto workers agitation in Akurdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.