Corona virus: पिंपरी शहरात कोरोनाचा १३ वा बळी; भोसरीतील चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:20 PM2020-05-19T17:20:09+5:302020-05-19T17:21:43+5:30
ही महिला पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात आया म्हणून नोकरीला होती..
पिंपरी: औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. भोसरीतील कोरोना बाधित चाळीस वर्षीय महिलेचा मंगळवारी महापालिका रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने आजपर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुण्यातील आठ जणांचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. भोसरी परिसरात राहणारी ही महिला पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात आया म्हणून नोकरीला होती.. या महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. महिलेवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील कोरोना बळींचा आकडा पाचवर गेला आहे.
....................................
असे झाले मृत्यू...
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा रूग्ण चार मार्चला सापडला होता. त्यानंतर महिना भरात सर्व रूग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर एक एप्रिलपासून मरकजहून आलेल्यांमुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागला. आणि १२ एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, २० एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि २४ एप्रिल रोजी निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, २९ एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा, ६ मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा वायसीएम रुग्णालयात, भोसरीतील पुरुष रुग्णाचा १० मे रोजी, ११ मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या पुरुष रुग्णाचा आणि आज १५ मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या तिघांचा तर मंगळवारी १९ मे रोजी भोसरीतील महिलेचा अशा १३ जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.