Corona virus : पिंपरीत अडीच महिन्यात कोरोनाचे ‘द्विशतक’, एका दिवसात २२ जणांना संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 07:57 PM2020-05-18T19:57:17+5:302020-05-18T20:02:08+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यातही कोरोनाचा प्रादूर्भाव लागला वाढू
पिंपरी : औद्योगिक नगरीतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने अडीच महिन्यात पॉझिटिव्ह रूग्णांनी सव्वा दोनशेचा आकडा पार केला आहे. कोरोनाचा झोपडपट्टीत शिरकाव झाला असून एका दिवसात आनंदनगर, चिंचवड येथील १७ जणांसह शहरातील एकुण बाविस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजअखेर २२५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
पिंपरी -चिंचवड परिसरात कोरोनाचा वेग कमी होता. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात हा वेग आता वाढू लागला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्यातही कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागला असून सुरूवातील पिंपरीतील खराळवाडीत पॉझिटिव्ह रूग्ण आढळले होते. त्यानंतर दाट लोकवस्ती असणाऱ्या काळेवाडी आणि रूपीनगर परिसरात सर्वाधिक रूग्ण आढळले होते. त्यानंतर आता चिंचवडस्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोना पसरू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी आनंदनगर येथील झोपडपट्टीत कोरोनाचा रूग्ण सापडल्यानंतर हा भाग सील केला होता. त्यामुळे संबंधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीत तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा रिपोर्ट आज आला असून त्यात १७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर भोसरी, येरवडा, येथील पाच जणांचाही रिपोर्ट पॉझिट्व्हि आले आहेत. त्यामुळे सक्रिय रूग्णांची संख्या ८६ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आजपर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून त्यात पुण्याचे आठ आणि पिंपरी-चिंचवडमधील चार जणांचा समावेश आहे.
.......................
कोणत्या प्रभागात रूग्ण वाढताहेत, आणि कोणत्या नाही
महापालिकेच्या आठही प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये प्रभागातील काही भागात रुग्ण नाहीत. पिंपरीगाव, खराळवाडी, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी, आकुर्डी, चिंचवडस्टेशन, मोहननगर, चिंचवडमधील पिंपळेगुरव, सौदागर, निलख, जुनी, नवी सांगवी, वाकड, पुनावळे, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, किवळे-विकासनगर आणि भोसरीतील भोसरी, दिघी, मोशी, च-होली, रुपीनगर, चिखली, संभाजीनगर शहराच्या जवळपास अशा संपुर्ण भागात आजपर्यंत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. मात्र, रावेत, चिंचवडगाव, निगडी, प्राधिकरण, यमुनानगर, निगडी गावठाण अशा काही भागात रुग्ण सापडले नाहीत.