Corona virus : मुंबईहून मुलीकडे आलेल्या महिलेस कोरोनाची लागण ; आयटीपार्क माण येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 04:58 PM2020-05-19T16:58:59+5:302020-05-19T17:03:19+5:30

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आल्याने अडकलेले अनेकजण करत आहेत स्थलांतर

Corona virus : Coronavirus infection in women who coming from ITpark Mumbai; Incidents in Maan | Corona virus : मुंबईहून मुलीकडे आलेल्या महिलेस कोरोनाची लागण ; आयटीपार्क माण येथील घटना

Corona virus : मुंबईहून मुलीकडे आलेल्या महिलेस कोरोनाची लागण ; आयटीपार्क माण येथील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देसंपर्कात आलेले तीनजण क्वारंटाईन आयटीनगरीत वास्तव्य करणारे नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर

हिंजवडी : आयटीनगरी माण येथे राहणाऱ्या आपल्या मुलीकडे आलेल्या जेष्ठ महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संपर्कात आलेल्या तीन जणांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिड महिन्यांच्या कालावधीनंतर लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आल्याने काही कारणास्तव 
अडकलेले अनेकजण स्थलांतर करत आहेत. माणमधील आयटीपार्क फेज तीन हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये वास्तव्य करत असणाऱ्या व्यक्तीने गुरुवारी (दि.१४) आपल्या आई वडिलांना मुंबई येथून आपल्याकडे आणले होते. मात्र दोन दिवसांनी आईला त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात तपासणी साठी नेले असता कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खबरदारी म्हणून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या घरातील तीन व्यक्तींना क्वारंटाईन करून त्यांची कोरोना संदर्भात तपासणी केली आहे. मात्र, त्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. विशेष म्हणजे चारच दिवसापूर्वी हिंजवडीत सुद्धा आपल्या नातेवाईकांकडे पाहुणा म्हणून आलेल्या जेष्ठ व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. या घटनेनंतर आयटीपार्क परिसरात एकच खळबळ उडाली होती. दोनच दिवसात माण मध्ये पुन्हा अशाचप्रकारे घटनेची पुनरावृत्ती झाल्याने तालुका आरोग्य विभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या आवाहनास आयटीनगरीत वास्तव्य करणारे नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दरम्यान आयटीनगरी परिसरात पुणे, मुंबई अथवा इतरत्र प्रवास करून कोणी आल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ आरोग्य विभाग अथवा स्थानिक प्रशासनाला कळवावे असे आवाहन माण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बालाजी लकडे यांनी केले आहे.

Web Title: Corona virus : Coronavirus infection in women who coming from ITpark Mumbai; Incidents in Maan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.