Corona virus : पिंपळेसौदागर, आकुर्डी, चिंचवड, रूपीनगरात आढळले नऊ रूग्ण;पिंपरीत कोरोनाबाधितांची संख्या ६२
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 09:48 PM2020-05-16T21:48:09+5:302020-05-16T21:49:06+5:30
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा होऊ लागला घट्ट
पिंपरी : औद्योगिकनगरीत गेल्या चोविस तासात नऊ रूग्णांची भर पडली आहे. शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ६२ वर गेली आहे. आजपर्यंत १९५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर सांगवी, पिंपळेसौदागर आणि पुण्यातील ऐशी वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसह तिघे जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. संशयित रूग्णांमध्ये वाढ होत असली तरी रूग्ण वाढीची चेन तोडण्यात यश आले आहे. पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिकेच्या रूग्णालयात कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी ७२ रूग्णांना रूग्णालयात दाखल केले आहेत. शुक्रवारी शहरातील ६३ जणांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले आहेत.त्यापैकी नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे आहे. तर उर्वरित ५३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आज ५८ जणांना घरी सोडून देण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी फुगेवाडी आणि पिंपळेसौदागर भागातील नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यापैकी एकाचे वय ७८ आणि दुसऱ्याचे ३५ वर्ष होते. त्यानंतर सायंकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चिंचवड स्टेशन, रूपीनगर, ताडीवाला रोड पुणे या भागातील आहेत. त्यात तीन पुरूष आणि चार महिलांचा समावेश आहे. पुरूषांमध्ये एकाचे वय ३४ वर्षे, दुसºयाचे वय ३८, तिसºयाचे वय १८ आणि चौथ्याचे वय ३ वर्ष आहे. तर महिलांमध्ये एकीचे वय ६४, दुसरीचे वय २४ वर्षे, तिसरीचे वय १३ आहे. आज तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सांगवी, पिंपळेसौदागर आणि पुणे येथील तीन रूग्ण झाले कोरोनामुक्त झाले आहेत. अखेरपर्यंत ११९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.