Corona virus Pimpri : पिंपरीत कोरोनामुक्तांचा आलेख झाला कमी; १२८ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 09:44 PM2021-09-08T21:44:50+5:302021-09-08T21:44:55+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात कमी झालेला कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे.
पिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून कोरोनामुक्तांची संख्या कमी झाली आहे.दिलासादायक बाब म्हणजे दाखल रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. तसेच कमी झालेले लसीकरण पुन्हा वाढले आहे. २० हजार नागरिकांना लसीकरण केले. कोरोनाने एकाचा बळी घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात कमी झालेला कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. शहर परिसरातील खासगी आणि शासकीय अशा विविध रुग्णालयांमध्ये ७ हजार २२८ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांपैकी १८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ५८५ वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह आणि गंभीर आणि दाखल रुग्णांची संख्या वाढत आहे.
...................
कोरोनामुक्तांचे प्रमाण झाले कमी
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले आहे. १२८ जण कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंत एकूण कोरोनामुक्तांची संख्या २ लाख ६५ हजार ६३१ वर पोहोचली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ७० हजार ९७० वर पोहोचली आहे.
......................
एकाचा मृत्यू
मृतांचा आलेख कमी झाला आहे. आज शहरातील १ आणि शहराबाहेरील १ अशा एकूण २ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर कोरोनाने मृत होणाºयांची संख्या ४ हजार ४०६ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक, तरूणांचा समावेश अधिक आहे.
...........................
लसीकरण वेग वाढला
महापालिका परिसरात मागील आठवड्यात लसीकरण मंदावले होते. आज पुन्हा वाढले आहे. आहे. शहरात महापालिका आणि खासगी रुग्णालये अशी २०२ केंद्र सुरू आहे. आज २० हजार ४२१ जणांना लस देण्यात आली आहे. एकूण लसीकरण १५ लाख ७२ हजार ३४२ वर पोहोचले आहे.