पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रविवारी पहाटेपासून दापोडी, कासारवाडी परिसर सील केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील विविध भाग सील केला आहे.
यापूर्वी चिखलीतील घरकुल रेसिडेन्सी-बिल्डिंग क्र. ए १ ते २० चिखली, (पवार इंडस्ट्रियल परिसर-नेवाळेवस्ती), जामा मस्जिद, खराळवाडी भोवतीचा परिसर, पिंपरी (गिरमे हॉस्पिटल-अग्रेसन लायब्ररी-कृष्णा ट्रेडर्स-चैताली पार्क हौसिंग सोसायटी, खराळ आई गार्डन, ओम हॉस्पिटल, ओरिएंटल बँक, सीटी प्राईड हॉटेल, क्रिस्टल कोर्ट हॉटेल, गिरमे हॉस्पिटल, कमलराज बालाजी रेसिडन्सी, रोडे हॉस्पिटलजवळ, दिघी, भोसरी), रोडे हॉस्पिटल-एसव्हीएस कॉम्प्युटर-स्वरा गिफ्ट शॉपी-साई मंदिर रोड-अनुष्का आॅप्टिकल शॉप-रोडे हॉस्पिटल, शिवतीर्थनगर, पडवळनगर थेरगाव, शिरोळे क्लिनिक-गणेश मंदिर-निदान क्लिनिक-कीर्ती मेडिकल-रेहमानिया मस्जिद-आॅर्कीड हॉस्पिटल-अशोका सोसायटी रोडवरील गणपती मंदिर ते शिरोळे क्लिनिक सील केले आहे. त्यानंतर भोसरी परिसर सील केला होता. पाच दिवसांपूर्वी खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर सील केला आहे. आजपर्यंत सात भाग सील केले आहेत.