क्रूरतेचा कळस! गुदद्वारात लावण्यास सांगितला झंडूबाम; चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 03:40 PM2021-05-01T15:40:08+5:302021-05-01T15:40:38+5:30
तीन अल्पवयीन मुलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्या व पट्ट्यांनी मारहाण केली. तसेच पाळलेले कुत्रे चावण्यासाठी अल्पवयीन मुलांच्या अंगावर सोडले.
पिंपरी : चोरीच्या संशयावरून तीन अल्पवयीन मुलांना जबरदस्तीने दुचाकीवरून घेऊन जाऊन टोळक्याने त्यांना मारहाण केली. त्या तिघांचे गुप्तइंद्रीय ओढूण ताणून त्या तिघांना एकमेकांच्या गुदद्वारामध्ये झंडूबाम बोटाने लावण्यास सांगितला. याप्रकरणी टोळक्यातील १९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरीतील रिव्हररोड येथील विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे दोन ते तीन महिन्यांपूर्वी रात्री साडेबारा ते पहाटे पाचच्या दरम्यान हा प्रकार घडला.
याप्रकरणी ४४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. सचिन सौदाई, सनी सौदाई, अजय टाक, जतीन मेवाती, अनिल पिवाल, जतीन टाक, तौसिफ सय्यद, कृष्णा बाक्सर पारधे, वरूण टाक, कपिल टाक, आशिष ननावरे, जय पिवाल, विनय देव, सद्दाम शेख, खलील शेख, अरुण टाक, विजय चव्हाण, खुबचंद मंगतानी उर्फ बुगी, सोनू मंगतानी (सर्व रा. पिंपरी, पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा १६ वर्षीय मुलगा व आणखी १६ व १७ वर्षीय दोन मुले यांनी पिंपरी भाजी मंडई येथे चोरी केल्याचा आरोपींना संशय होता. त्यावरून आरोपींनी त्या तीनही अल्पवयीन मुलांना दुचाकीवरून जबरदस्तीने पिंपरीतील रिव्हररोड येथील विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घेऊने गेले. तेथे शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व पट्ट्यांनी मारहाण केली. तसेच पाळलेले कुत्रे चावण्यासाठी अल्पवयीन मुलांच्या अंगावर सोडले. तिघांची गुप्त इंद्रिय जबरदस्तीने ओढून ताणून शिवीगाळ केली. त्यानंतर त्या तिघांना एकमेकांच्या गुदद्वारात झंडूबाम बोटाने लावण्यास सांगितला. पुन्हा या भागात दिसायचे नाही व कोठे तक्रार करायची नाही, असा दम दिला.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. ही बाब पीडित अल्पवयीन मुलाच्या फिर्यादी आईच्या निदर्शनास आली. त्यांनी याबाबत मुलाकडे विचारणा केली असता, हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने पोलिसांकडे धाव घेत याबाबत तक्रार केली. त्यानुसार बाल लैंगिक अत्याचारा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.