बापरे! पिंपरीतील कॅम्पमध्ये तुडुंब गर्दी, सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 10:34 AM2021-05-13T10:34:20+5:302021-05-13T10:34:59+5:30

ईदच्या खरेदीसाठी नागरिक मार्केटमध्ये

Dad! Crowds at the camp in Pimpri, a fuss of social distance | बापरे! पिंपरीतील कॅम्पमध्ये तुडुंब गर्दी, सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

बापरे! पिंपरीतील कॅम्पमध्ये तुडुंब गर्दी, सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

Next
ठळक मुद्देखरेदीसाठी झालेली गर्दी बनू शकते कोरोना वाढण्याचे कारण

पिंपरी: पुणे शहरासहित पिंपरी - चिंचवडमध्येही कोरोना ससंर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाने अत्यावश्यक सेवांनाही सकाळी ११ पर्यंतच परवानगी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सणसुदीही साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री करत आहेत. उद्या ईदही साधेपणाने आणि नियम पाळून साजरी करावी असे सांगण्यात आले आहे. तरीही आज सकाळी पिंपरीतील कॅम्पमध्ये नागरिकांनी ईदच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.

रमझान ईदचा महिना मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानला जातो. अनेक दिवसांच्या उपवावासानंतर उद्याच्या दिवशी शिर कुरमा सारखे स्वादिष्ट पदार्थ तयार करतात. घरोघरी जाऊन सण साजरा केला जातो. त्यानिमित्ताने खरेदीसाठी नागरिक दरवर्षी बाहेर पडतात. पण यंदा कोरोनाची दुसरी लाट आल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. सर्व कार्यक्रमाबरोबरच सण, उत्सव यावर बंदी घालण्यात आली आहे. तेच धार्मिक विधी करून साधेपणाने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ईदच्या खरेदीसाठी झालेली गर्दी कोरोना वाढण्याचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत त्याठिकाणी एकही पोलीस नसल्याचे दिसून आले आहे. तसेच नागरिक सोशल डिस्टनसिंग पाळणे विसरल्याचे दिसत आहे. काहींनी तर मास्कही व्यवस्थित घातले नाहीत. ज्येष्ठांनाही बाहेर न पडण्याचे सांगण्यात आले आहे. पण या मार्केटमध्ये अनेक ज्येष्ठ दिसून आले आहेत. असेच जर नागरिक नियमांची पायमल्ली करून वागू लागले. तर कोरोनाला आटोक्यात आणणे हे प्रशासनासमोरील आव्हान असणार आहे. 

Web Title: Dad! Crowds at the camp in Pimpri, a fuss of social distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.