पिंपरी -चिंचवड:- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या साठी नागरिकांना फिजिकल डिस्टनसिंग पाळण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.याचे पालन व्हावे य साठी शरतात यंत्रणा करीरात करण्यात आल्या आहेत. विविध भागात होणारी गर्दी व अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचा अतिक्रमण विरोधी पथक व पोलीस संयुक्त कारवाई करीत आहेत. मात्र एकाच वाहनात दाटीवाटीने बसून अधिकारी व कर्मचारी धक्कादायक प्रवास करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे.लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत पणे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यलयाच्या हद्दीत यंत्रणा उभारण्यात आली आहे. पोलीस अधिकारी बिट अधिकारी,पोलीस कर्मचारी,चालक,व महापालिकेचे कर्मचारी या साठी विविध भागात फिरून कारवाई करीत आहेत.रस्त्यावर फिरणाऱ्या हातगाड्या व पथारी वाल्या व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी हे पथक फिरत आहे.या मुळे अनेक भागातील अनधिकृत विक्रेते धास्तावले आहेत.मात्र या वाहनात क्षमते पेक्षा जास्त कर्मचारी बसत असल्याने यांच्यात सोशल डिस्टनसिंग चा नियम पाळला जात नाही.हा गंभीर प्रकार असूनही या बाबत कोणतीही दाखता घेतली जात नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.दाटीवाटीने कारवाई साठी प्रवास करणारे हे कर्मचारी धोकादायक परिस्थितीत आहेत हे प्रशासनाच्या लक्षात येत नसावे ही खरी शोकांतिका आहे.अत्यावश्यक सेवेत आपले कर्तव्य बजावणाऱ्या या कर्मचार्यांबाबत पालिका व पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी व अतिरीक्त वाहन व्यवस्था उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे.----------------संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणारअतिक्रमण विरोधी पथकाच्या वाहनांमध्ये चार ते पाच मजूर व दोन अधिकारी अशी व्यवस्था आहे.जर या पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर ते फिजिकल डिस्टंन्सिंगच्या दृष्टीने चुकीचे आहे . या बाबत मी त्वरित सूचना देणारा आहे. अशा गोष्टी सुरक्षिततेच्या दृष्टीने चुकीच्या आहेत.मकरंद निकम, वरिष्ठ अधिकारी अतिक्रमण विभाग
पिंपरीत अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या पथकाचा धोकादायक प्रवास; 'फिजिकल डिस्टंन्सिंग'चा फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 6:01 PM
एकाच वाहनात दाटीवाटीने बसून अधिकारी व कर्मचारी धक्कादायक प्रवास करीत असल्याचे वास्तव समोर
ठळक मुद्देएकाच वाहनात १५ जणांचा सहभाग