विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 03:20 AM2018-05-09T03:20:58+5:302018-05-09T03:20:58+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्तात्रय साने यांची वर्णी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गटनेते म्हणून साने यांच्या नावाची नोंदणी मंगळवारी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे केली. अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्तात्रय साने यांची वर्णी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गटनेते म्हणून साने यांच्या नावाची नोंदणी मंगळवारी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे केली. अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.
महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीचा पायउतार झाला. ९२ वरून राष्ट्रवादीचे ३६ नगरसेवक निवडून आले. गेल्यावर्षी माजी महापौर योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे सोपविली होती. मात्र, बहल यांच्या विरोधात शहरातील नेत्यांनी तक्रारी केल्या होत्या. भाजपाशी सलगी केल्याचा आरोप केला. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद बदलणार हे निश्चित झाले होते. हा बदल करताना राष्टÑवादीने प्रत्येकवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्यात येणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितले होते.
योगेश बहल यांनी ५ मे रोजी राजीनामा दिला होता. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता वाढीला लागली होती. या पदासाठी चिखलीतील नगरसेवक दत्ता साने, माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, नगरसेवक नाना काटे यांच्या नावाची चर्चा होती. शेवटच्या टप्प्यात साने की काटे यापैकी कोण? ही चर्चा रंगली होती. साने यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असे ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते. आक्रमकपणे विचार मांडणाऱ्या साने यांना पक्षनेतृत्वाने यावर्षी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर साने यांच्या नावाची नोंदणी आज पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
जनतेच्या विरोधी काम करणा-या सत्ताधाºयांच्या चुकीच्या कामांना आता सुटी नाही. चुकीचे कामे होऊ देणार नाही. मात्र, जनहिताच्या आणि शहरविकासाच्या कधीही विरोधी असणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन जनहिताची भूमिका परिणामकारकपणे मांडणार आहे. - दत्ता साने
४येत्या सर्वसाधारण सभेत किंवा येत्या काही दिवसांत महापौर नितीन काळजे यांच्याकडून साने यांची निवड जाहीर करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे साने हे ज्येष्ठ नगरसेवक असून महापालिका सभागृहात तिसºयांदा निवडून आले आहेत. नगरसेवक असताना त्यांनी सभागृहात आक्रमकपणे प्रश्न मांडले. भाजपाला सभागृहात आक्रमकपणे विरोध होण्यासाठी सत्ताधाºयांना अडविण्यासाठी साने यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे.