पिंपरी : महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजीचे काम सुरु आहे. डागडुजीचे काम करीत भूमीगत पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. या टाकीत पडून एका ६५ वर्षीय वृद्ध कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. कचरू लिंबाजी डोंगरे (रा. विठ्ठलनगर) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रूग्णालयात पाठविला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजीचे काम सुरु आहे. कचरू डोंगरे हे तेथे एका ठेकेदारामार्फत काम करीत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक भोवळ आल्याने तोल जाऊन ते खाली कोसळले. गंभीर इजा झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ठेकेदाराने सुरक्षा साधने पुरविली नाहित, निष्काळजीपणा दाखविला त्यामुळे मजुराला जीव गमावण्याची वेळ आली. असा आरोप मजुराच्या नातेवाईकांनी केला आहे. या बाबत अधिक माहिती घेऊन ठेकेदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असे पिंपरी पोलिसांनी सांगितले.
पाण्याच्या टाकीचे काम करताना पिंपरी चिंचवडमध्ये मजूराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 4:19 PM
पिंपरी महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजीचे काम सुरु आहे. डागडुजीचे काम करीत भूमीगत पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. या टाकीत पडून एका ६५ वर्षीय वृद्ध कामगाराचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देकचरू लिंबाजी डोंगरे (रा. विठ्ठलनगर) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव ठेकेदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल : पिंपरी पोलीस