एसएसपीएमएस शाळेच्या मैदानावर दीपोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:23 AM2018-11-11T01:23:01+5:302018-11-11T01:23:29+5:30

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित ‘श्री छत्रपती शिवाजीमहाराज दीपोत्सव २०१८’, पर्व ७ चे. श्री शिवछत्रपती

Deepprasav at SSPMS school grounds | एसएसपीएमएस शाळेच्या मैदानावर दीपोत्सव

एसएसपीएमएस शाळेच्या मैदानावर दीपोत्सव

Next

पुणे : तुतारीची ललकारी... सनईचौघड्यांचा मंगलमय सूर आणि श्री शिवछत्रपतींचा प्रचंड जयघोष... अशा शिवमय झालेल्या वातावरणात तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या अष्टसहस्र पणत्यांच्या लखलखाटात श्री छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पहिल्या भव्यदिव्य अश्वारूढ पुतळ्याला मानवंदना दिली.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित ‘श्री छत्रपती शिवाजीमहाराज दीपोत्सव २०१८’, पर्व ७ चे. श्री शिवछत्रपती पुतळा, एसएसपीएमएस संस्था प्रांगण येथे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन पुणे शहर पोलीस सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, ज्येष्ठ विधिज्ञ प्रताप परदेशी, समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सुनील मारणे व शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी झालेल्या स्वराज्य घराण्यांच्या हस्ते झाले.

अटकेपार झेंडा फडकवणारे पानिपत वीर सरदार मानाजी पायगुडे, श्रीमंत सरदार कान्होजी कोंडे, सरदार बाबाजी ढमढेरे, शिवसरदार पिलाजीराव सणस, सरदार हैबतराव शिळीमकर, सरदार त्र्यंबकराव नाईक निवंगुणे, सरदार जैताजी नाईक करंजावणे, सरदार कडू, प्रतापगड युद्धवीर सरदार बाबाजी आढळराव डोहर धुमाळ या स्वराज्य घराण्यांच्या प्रतिनिधींना शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागाची यशस्वी ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन विशेष गौरव केला.

बोडखे म्हणाले, पुण्यात साजऱ्या होणाऱ्या दीपोत्सवाचा शिरोमणी म्हणून हा दीपोत्सव पुणेकरांच्या हृदयात विराजमान झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यासारखा दिमाखदार उत्सव साजरा केला जातो.
गायकवाड म्हणाले, या ऐतिहासिक पुतळ्याने ९१व्या वर्षांत पदार्पण केले आहे. पुतळ्याचे वजन तब्बल ८ हजार किलो आहे.
नियोजन ललित शिंदे, रवींद्र कंक, सचिन पायगुडे, दीपक घुले, अनिल पवार, दिग्विजय जेधे, महेश मालुसरे व स्वराज्य बांधवांनी केले.

Web Title: Deepprasav at SSPMS school grounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.