बदनामी करण्याची धमकी देत मागितली २ लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 07:26 PM2019-04-14T19:26:21+5:302019-04-14T19:28:33+5:30
लग्नापुर्वी मुलीबरोबर अनैतिक संबंध होते, असे सगळीकडे सांगून तिची बदनामी करीन अशी धमकी देत मुलीच्या आईकडे २ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
पिंपरी : लग्नापुर्वी मुलीबरोबर अनैतिक संबंध होते, असे सगळीकडे सांगून तिची बदनामी करीन अशी धमकी देत मुलीच्या आईकडे २ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
समीर चंद्रकांत सुर्वे (वय ३०, रा. ओम शांती होम्स सोसायटी, आंबेगाव बुद्रुक, पुणे, मूळ-भोंगवली ता. भोर, जि. पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका ५४ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० जानेवारी ते ८ एप्रिल दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, समीर याने फिर्यादी यांना फोन केला. तसेच तुमच्या मुलीकडे माझे दोन लाख रुपये आहेत. ते मला द्या, नाही तर मी तुमच्या मुलीचे व माझे लग्नापूर्वी अनैतिक संबंध होते, असे सगळीकडे सांगून तिची बदनामी करीन, असे म्हणत पैशांची मागणी केली. तसेच फिर्यादी यांच्या मुलीचे लग्न झाले असतानाही समीर सुर्वे हा सतत तिच्या घरी जाऊन तिला भेटण्याचा प्रयत्न करीत होता. व तिच्या मनास लज्जा होईल असे वर्तन केले आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करुन सुर्वे याला अटक केली आहे.