अपघातग्रस्त ट्रेलरमुळे आयटीयन्सची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:46 AM2018-11-30T01:46:46+5:302018-11-30T01:46:59+5:30

पिंपळे सौदागर : चाकरमान्यांचे हाल; स्थानिकांसह पोलिसांची तारांबळ

DUE TO ACCIDENTAL TRAILER TRAFFIC BECAME WORST | अपघातग्रस्त ट्रेलरमुळे आयटीयन्सची कोंडी

अपघातग्रस्त ट्रेलरमुळे आयटीयन्सची कोंडी

Next

रहाटणी : रहाटणी-पिंपळे सौदागर येथील साई चौकामध्ये मागील काही वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे शिवार चौकाकडून वाकडकडे जाताना ४५ मीटर रस्त्यावर लोखंडी बार लावण्यात आला आहे. त्यामुळे ठरावीक उंचीची वाहने येथून जाऊ शकतात. असे असतानाही जास्त उंचीचा ट्रेलर येथून नेण्याचा प्रयत्न एका चालकाने केला. परिणामी ट्रेलर धडकल्याने हा लोखंडी बार तुटला. तुटलेला लोखंडी बार ट्रेलरमध्ये अडकला. त्यामुळे पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. सकाळी हिंजवडीकडे निघालेल्या आयटीयन्सना याचा फटका बसला. वाहनांच्या रांगा लागून आयटीयन्स या कोंडीत अडकले होते.


पिंपळे सौदागर येथील साई चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे शिवार चौक ते साई चौकाच्या दरम्यान वाकडकडे जाण्याच्या मार्गावर जास्त उंचीचे वाहने जाऊ नयेत म्हणून लोखंडी बार लावण्यात आले होते. या लोखंडी बारला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक ट्रेलर धडकला. दोन जुन्या ट्रकच्या च्यासी या ट्रेलरमध्ये होत्या. ट्रेलरचालकाला उंचीचा अंदाज न आल्याने ट्रेलर लोखंडी बारला धडकला. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. या अपघातानंतर ट्रेलरचालक पसार झाला.


साई चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने डांगे चौकाकडून येणारी वाहतूक शिवाजी चौकातून वळवण्यात आली. या मार्गावर वाहतूककोंडी असते. त्यात ट्रेलरचा अपघात झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिकांसह वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली.


अपघातग्रस्त ट्रेलर क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या कडेला घ्यायचे म्हटले तर या ट्रेलरवर असणाऱ्या दोन जुन्या ट्रकच्या च्यासी खाली पडण्याची शक्यता होती. त्यामुळे हा ट्रेलर बाजूला कसा करावा हा मोठा प्रश्न वाहतूक पोलिसांसमोर होता. पोलिसांनी बीआरटीएस मार्गामधून वाहतूक सुरू केली. त्यामुळे सकाळी साडेदहानंतर वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.

अनेकांचे प्राण वाचले
अपघातग्रस्त ट्रेलरच्या मागे व पुढे अनेक वाहने होती. ट्रेलरचालकाच्या चुकीमुळे व अंदाज न आल्याने चालकाने हा ट्रेलर लोखंडी बारच्या खालून वेगात घातला. मात्र लोखंडी बार तुटला नसता तर ट्रेलरच्या पाठीमागून येणाºया अनेक वाहनांना अपघात झाला असता व यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला असता. मात्र सुदैवाने वेळेतच सर्वांनी दक्षता घेतल्यामुळे अनेकांना आपले प्राण वाचवता आले.

Web Title: DUE TO ACCIDENTAL TRAILER TRAFFIC BECAME WORST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात