पिंपरी : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड होणार होती. मात्र, इच्छुकांच्या नावांवर एकमत न झाल्याने भाजपा, राष्टÑवादी, शिवसेनेच्या सदस्यांची नावे निश्चित झालेली नाहीत. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुक सदस्य गॅसवर आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड आजच्या सर्वसाधारण सभेत होणार होती. मात्र, दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करून सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे सदस्यपदासाठी देव पाण्यात ठेवलेल्या इच्छुकांची घोर निराशा झाली. स्थायी समितीत १६ सदस्य असून, त्यात भाजपाचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेना एक आणि अपक्ष एक आहे. भाजपाचे सर्वाधिक सदस्य आहेत.
सत्ताधारी भाजपाने स्थायी समितीत पाच वर्षांत दर वर्षी दहा आणि अपक्ष एक अशी ५५ नगरसेवकांना संधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. समितीतील ११ जणांचा राजीनामा भाजपाने घेतला होता. त्यामुळे या वेळी सत्ताधारी कोणता निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. आज सर्वसाधारण सभेच्या वेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार अनुपस्थित होते. त्यावरून नावांबाबत सत्ताधाऱ्यांत एकमत झाले नसल्याचे दिसून येत आहे. तसेच जुन्यांना संधी देणार की नव्यांना यावरही एकमत झाले नसल्याचे दिसून येत आहे.तरुणांना की महिलांना संधी?राष्ट्रवादीने स्थायी समिती सदस्यपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. त्यासाठी १६ अर्ज आले. त्यात वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, स्वाती काटे, विनया तापकीर, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, श्याम लांडे, विनोद नढे, जावेद शेख, राजू बनसोडे, रोहित काटे, संतोष कोकणे, मयूर कलाटे, समीर मासूळकर, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर यांचा समावेश आहे. स्थायी समितीतून दोन जण बाहेर पडत आहेत. त्यामुळे ज्येष्ठांना संधी मिळणार की तरुणांना याबाबत राष्टÑवादीत एकमत झालेले नाही. अपक्ष आणि शिवसेनेचाही घोळस्थायी समितीवर अपक्षांच्या वतीने एकाला संधी दिली जाते. या वर्षी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेतही कोणाला संधी द्यायची? याबाबत मातोश्रीवरून आदेश आलेला नाही. सभागृहात बोलणारा व्यक्ती असावा, अशी सदस्यांची मागणी आहे. गेल्या दोन वर्षांत महापालिकेतील विविध समितींवर कोणास संधी दिली आहे. त्याची माहिती पक्षश्रेष्ठींकडे पाठविली आहे. त्यातून एकाची निवड होईल.भाजपातर्फे शीतल शिंदे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे यांची नावेपिंपरी : स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड शुक्रवारी होणाºया सर्वसाधारण सभेत होणार असून, पक्षीय बलाबलानुसार पाच जणांची निवड सत्ताधारी भाजपातर्फे केली जाणार आहे. जुन्या कार्यकर्त्यांपैकी शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि राजेंद्र लांडगे यांची वर्णी लागणार आहे. तसेच अपक्षांपैकी एकाची वर्णी लागणार आहे. स्थायी समितीवरील सदस्यांच्या निवडीसाठी भाजपा आणि अपक्ष अशा पाच, राष्टÑवादी काँग्रेस दोन आणि अपक्ष एक अशा आठ जागा निवडल्या जाणार आहेत.४त्यातूनच सभापती कोण होणार हे निश्चित होणार आहे. चिंचवड विधानसभेतून दोन आणि भोसरी विधानसभेतून दोन जणांना संधी देण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे. भोसरी विधानसभेतून राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, चिंचवड विधानसभेतील शीतल शिंदे यांचे, तर सांगवी-नवी सांगवी-पिंपळे गुरव परिसरातील एका नगरसेविकेचा समावेश असून, अपक्षांच्या वतीने कोणाला संधी देणार याबाबत उत्सुकता आहे. तसेच, शिदे की लांडगे सभापती होणार याचीही उत्सुकता आहे.