पिंपरी-चिंचवडमध्ये डुप्लिकेट मतदार! चिंचवड व भोसरीत फोटो नसलेल्या मतदारांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 10:28 AM2023-01-16T10:28:05+5:302023-01-16T10:33:06+5:30

मतदारांची संख्या ५४ हजारांनी घटली...

Duplicate voters in Pimpri-Chinchwad! In Chinchwad and Bhosari, the number of voters without photo is more | पिंपरी-चिंचवडमध्ये डुप्लिकेट मतदार! चिंचवड व भोसरीत फोटो नसलेल्या मतदारांची संख्या अधिक

पिंपरी-चिंचवडमध्ये डुप्लिकेट मतदार! चिंचवड व भोसरीत फोटो नसलेल्या मतदारांची संख्या अधिक

googlenewsNext

पिंपरी : महापालिका परिसरात निरंतर मतदार नोंदणी आणि पुनरीक्षण करण्यात येत आहे. त्यात गेल्या वर्षी ३१ मे रोजी जाहीर मतदार यादीच्या तुलनेत मतदारसंख्येत ५३ हजार ७३५ ने घट झाली आहे. त्यात डुप्लिकेट मतदारांची संख्या अधिक आली आहे. तसेच चिंचवड व भोसरीसह पिंपरी मतदारसंघात फोटो नसलेल्या मतदारांची संख्या अधिक आहे.

१४ लाख ४६ हजार ९५८

जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार ओळखपत्राला आधार कार्ड लिंक; नाव, वय, पत्यात दुरुस्ती; मयत व नवीन नोंदणी अशा दुरुस्त्या झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. भोसरीचा क्रमांक जिल्ह्यात तिसऱ्या स्थानावर आहे. असे असले तरी या तिन्ही मतदारसंघांत मिळून १४ लाख ३७ हजार ३८३ मतदार आहेत. ताथवडेमध्ये नऊ हजार ५७५ मतदार आहेत. मात्र, ताथवडेचा समावेश भोर विधानसभा मतदारसंघात आहे. त्यासह शहरातील एकूण मतदारसंख्या १४ लाख ४६ हजार ९५८ झाली आहे.

मतदारांची संख्या ५४ हजारांनी घटली

महापालिका निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ३१ मे २०२२ पर्यंतची विधानसभा मतदारयादी ग्राह्य धरून त्याची प्रभागनिहाय विभागणी करून प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी २३ जून रोजी महापालिकेने प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती व सूचना मागवल्या होत्या. चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभा मतदारसंघाच्या यादीत नाव असूनही महापालिकेच्या यादीत नाव नसणे यासंदर्भात दुरुस्त्या केल्या आहे. मतदारसंख्येत ५३ हजार ७३५ ने घट झाली आहे.

विधानसभानिहाय मतदार (५ जानेवारी २०२३)

मतदारसंघ / मतदारसंख्या

चिंचवड / ५,६६,४१५

पिंपरी / ३,५७,२०७

भोसरी / ५,१३,७६१

भोर (ताथवडे) / ९५७५

एकूण / १४,४६,९५८

३० ते ४० वयोगटातील मतदारांत वाढ

महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०२२ ला होणे अपेक्षित होते. यासाठी एक जानेवारी २०२२ रोजी जाहीर केलेल्या मतदार यादीनुसार शहराची मतदारसंख्या १४ लाख ४६ हजार १४९ होती. ३१ मे रोजी जाहीर झालेल्या पुरवणी यादीनुसार त्यात ५४ हजार ५४४ मतदारांची भर पडून एकूण मतदारसंख्या १५ लाख ६९३ झाली होती. नोंदणीत ३० ते ४० वयोगटातील मतदारांत वाढ झाली आहे.

Web Title: Duplicate voters in Pimpri-Chinchwad! In Chinchwad and Bhosari, the number of voters without photo is more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.