मुख्य सभागृहाबाहेर कर्मचाऱ्यांना मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 03:09 AM2018-05-09T03:09:45+5:302018-05-09T03:09:45+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पहिल्या आणि तिसºया मजल्यावरील सभागृहाबाहेर महापालिका कर्मचाºयांनी थांबू नये. आपल्या विभागात काम करावे, कर्मचारी सभागृहाबाहेर आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा फतवा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पहिल्या आणि तिसºया मजल्यावरील सभागृहाबाहेर महापालिका कर्मचाºयांनी थांबू नये. आपल्या विभागात काम करावे, कर्मचारी सभागृहाबाहेर आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा फतवा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पहिल्या मजल्यावर महापालिकेची सर्वसाधारण सभा होत असते. दर महिन्याच्या २० तारखेस यशवंतराव चव्हाण सभागृहात आहे. तर तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची साप्ताहिक सभा दर बुधवारी होत असते. या मजल्यावर विविध विषय समित्यांच्या सभा नियमितपणे होतात. सभा कामकाजासाठी महापालिकेचे अधिकारी त्यांच्यासोबत संबंधित विभागातील ‘ड’ वर्गाचे कर्मचारी कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहतात.
सभेचे कामकाज सुरू असताना कर्मचारी आपल्या विभागात न जाता सभागृहाबाहेर नाहक थांबून व्यर्थ वेळ घालवित असतात, ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली़ त्यामुळे त्यांनी कामचोरांसाठी फतवा काढला आहे.
कर्मचारी सभागृहाबाहेर आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आदेश निघाला असला तरी किती कर्मचारी या आदेशाचे पालन करतात. हे लवकरच दिसून येणार आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा, स्थायी समिती, विविध विषय समिती, तसेच अन्य कोणत्याही सभेला उपस्थित राहताना अधिकाºयांनी आपल्या विभागातील ड वर्गातील कर्मचाºयांना सभा कामकाज संपेपर्यंत नाहक थांबवून ठेवू नये. कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यकता असल्यास विभागप्रमुखांनी संबंधित कर्मचाºयास पुन्हा बोलावून घ्यावे. संबंधित कर्मचारी त्या ठिकाणी वेळ वाया घालवणार नाही, याची व्यक्तिश: दक्षता घ्यावी.
- श्रावण हर्डीकर,
आयुक्त, पिं.चिं.मनपा