PCMC हद्दीत कोरोनाने निधन झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार २५ हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 07:49 PM2021-10-29T19:49:14+5:302021-10-29T19:51:38+5:30
प्रत्येक कुटुंबीयांना अर्थसाहाय्य म्हणून महापालिका २५ हजार रुपये देणार आहे. परंतु, यासाठी निधन झालेल्या व्यक्तीचे वय पन्नास वर्षे असावे अशी अट होती. ही अट रद्द करावी, अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आली. त्यास मंजुरी दिली आहे.
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत कोविड काळात अनेक कुटुंबातील कमावत्या व्यक्तींचे निधन झाले आहे. अशा प्रत्येक कुटुंबीयांना अर्थसाहाय्य म्हणून महापालिका २५ हजार रुपये देणार आहे. परंतु, यासाठी निधन झालेल्या व्यक्तीचे वय पन्नास वर्षे असावे अशी अट होती. ही अट रद्द करावी, अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आली. त्यास मंजुरी दिली आहे.
कै. मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली. या दोन्ही बैठकांमधील एकूण ७५ विषयांपैकी ५९ विषय मंजूर करण्यात आले, तर ऐनवेळच्या २३ विषयांनाही मंजुरी देण्यात आली. विकास कामे व इतर ऐनवेळच्या विषयांसह एकूण ३२ कोटी ७५ लाख ५७ हजार ४४१ रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे होते. शहरातील सुमारे पावणेचार हजार नागरिकांची मृत्यू झाला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांना पंचवीस हजारांची मदत देता येते. मात्र, त्यासाठी पन्नास वर्षांवरील नागरिकांसाठी ही मदत होती. त्यामुळे अनेक नागरिक मदतीपासून वंचित राहत होते.
सदस्या भीमाताई फुगे यांनी मदतीसाठी वयाची अट रद्द करावी अशी मागणी केली. त्याला स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी अनुमोदन देत यामधील निधन व्यक्तींच्या वयाची अटच रद्द करावी अशी मागणी केली. त्यानंतर सदस्यांची ही मागणी आयुक्त राजेश पाटील यांनी मान्य केली.