पिंपरी : चिखली येथील जाधववाडी येथे लाकडच्या एका गोदामाला आग लागली. सोमवारी दुपारी ही घटना घडली. अग्निशामक दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. चिखलीतील जाधववाडी व कुदळवाडी परिसरात भंगार, औद्योगिक स्क्रॅप आदींची दुकाने व गोदाम मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच बांधकाम व औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या लाकडाची दुकाने व गोदाम देखील आहेत. येथे आगीचे प्रकार सातत्याने घडत असतात. अशाच प्रकारे जाधववाडी येथील रंजन वजन काट्याजवळील लाकडाच्या एका गोदामाजवळ सोमवारी दुपारी अचानक आग लागली. आगीची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड अग्निशामक विभागाच्या सर्व केंद्रांवरील तसेच चाकण एमआयडीसी, पीएमआरडीए व काही खासगी कंपन्यांचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शथीर्चे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. तसेच किती नुकसान झाले याचीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
चिखलीत लाकडाच्या गोदामाला भीषण आग; अग्निशामक दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 4:37 PM
चिखली परिसरात भंगार, औद्योगिक स्क्रॅप आदींची दुकाने व गोदाम मोठ्या प्रमाणात
ठळक मुद्देआग आटोक्यात आणण्यात यश