चांदखेड येथे ग्रामदैवताच्या उत्सवामध्ये दहशत निर्माण करणाच्या उद्देशाने गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 03:02 PM2023-01-11T15:02:34+5:302023-01-11T15:02:46+5:30
गोळीबाराच्या घटनेने गावामध्ये दहशतीचे वातावरण
चांदखेड : ग्रामदैवताच्या उत्सवामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पाच सहा जणांच्या टोळक्याकडून हवेमध्ये गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवारी सायंकाळी चांदखेड या ठिकाणी घडली.
मंगळवारी चांदखेड या ठिकाणी ग्रामदैवताची यात्रा होती. या यात्रेमध्ये दहशत पसरविण्यासाठी अविनाश बाळासाहेब गोठे (वय २२, रा. चांदखेड), विजय अशोक खंडागळे (वय १८, रा. चांदखेड), अमर उत्तम शिंदे (वय २२, रा. बालाजीनगर, परदंवडी), महेश शिवचरण यादव (वय २०, रा. चांदखेड) व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते.
आरोपींना शिरगाव-परदवंडी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ, पोलिस अंमलदार समाधान फरतडे, पोलिस नाईक समीर घाडगे यांनी सर्व आरोपींना औंध येथून ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बी. सी. गावीत करत असून गोळीबाराच्या घटनेने गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.