पिंपरी पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून पावणेतीन लाखांच्या चार दुचाकी चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 09:31 PM2020-01-29T21:31:12+5:302020-01-29T21:32:15+5:30
याप्रकरणी दिघी, चाकण, एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी : पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकीचोरट्यांनीचोरून नेल्या. याप्रकरणी दिघी, चाकण, एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष विष्णू नलावडे (वय २८, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नलावडे यांनी त्यांची २ लाख रुपये किमतीची दुचाकी घराच्या व्हरांड्यात उभी केली होती. चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे. समरथमल बगडीराम गादडी (वय ३०, रा. चाकण) यांनी चाकण पोलीसात फिर्याद दिली आहे. गादडी यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी २३ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता घरासमोर उभी केली होती. चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. गोकुळ बाळू मिसाळ (वय ३२, रा. मोशी, प्राधिकरण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीसात फिर्याद दिली आहे. मिसाळ यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी २५ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता इंद्रायणीनगर येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केली. भर दिवसा चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. सौरभ सिंग ब्रिजसन सिंग (वय ३०, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंग यांनी त्यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी सोसायटीच्या पार्कींगमध्ये उभी केली असता चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.