सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलात्काराच्या चार घटना उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 03:04 PM2018-02-10T15:04:27+5:302018-02-10T15:06:27+5:30

सांगवी पोलीस ठाण्यात चार बलात्काराच्या घटनांची नोंद झाली असून त्यातील पीडितांमध्ये दोन महिला वयाच्या चाळीशी ओलांडलेल्या आहेत तर दोन मुली अल्पवयीन आहेत. एकाच वेळी चार घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Four incidents of rape were reported in Sangwi police station area, Pimpri Chinchwad | सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलात्काराच्या चार घटना उघडकीस

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलात्काराच्या चार घटना उघडकीस

Next
ठळक मुद्देसांगवी पोलीस ठाण्यात चार बलात्काराच्या घटनांची नोंदपीडितांमध्ये दोन महिला वयाच्या चाळीशी ओलांडलेल्या तर दोन मुली अल्पवयीन

पिंपरी : सांगवी पोलीस ठाण्यात चार बलात्काराच्या घटनांची नोंद झाली असून त्यातील पीडितांमध्ये दोन महिला वयाच्या चाळीशी ओलांडलेल्या आहेत तर दोन मुली अल्पवयीन आहेत. एकाच वेळी चार घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 
पिंपळेनिलख येथे राहणाऱ्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपी मूळचा नाशिक येथील असून संतोष महाले असे त्याचे नाव आहे. २००८ पासून तो पीडित महिलेच्या संपर्कात होता. लग्नाचे आमिष दाखवून नाशिक, गुजरात येथील लॉजमध्ये त्याने तिच्यावर जबरदस्ती केली.एवढेच नव्हे तर तिच्याकडून ६ लाख ५० हजार रुपये आणि १६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल नेला. सांगवी पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार नोंदविली आहे. 
दुसऱ्या घटनेत ताडीवाला रोड येथील आरोपी गणेश मारूती म्हस्के याने पिंपळे सौदागर येथे कालनीत भाड्याने राहणाऱ्या १७ वर्षे वयाच्या तरूणीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. आॅगस्ट २०१७ला आरोपी तरूणीच्या आईला भेटण्यासाठी आला. पीडित तरूणीची आई, भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते. तरूणी एकटीच घरी होती. त्यावेळी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिला कात्रज येथील लॉजवर नेले. तेथेही तिच्यावर अत्याचार केला. 
तिसऱ्या घटनेत नाशिकफाटा कासारवाडी येथे गप्पा मारण्यासाठी बोलावून आरोपीने १४ वर्षे वयाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पिंपळेगुरव येथील अल्पवयीन मुलीला घोलपूर, राजस्थान येथे नेले. तेथे त्याचा भाऊ तसेच मेहुणा यांच्याकडे १५ दिवस ठेवले. तेथेही तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आले. इच्छेविरूद्ध तिच्यावर शारीरिक संबंध ठेवले. मुलगी गरोदर राहिल्यानंतर आठ महिन्यांनी ही बाब उघडकीस आली आहे. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार अजय या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फिर्याद बालकांचे संगोपन करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकारी महिलेने दिली आहे. 
पिंपळेगुरव येथील आणखी एका अल्पवयीन मुलीवर तिची आई घरात नसताना, नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीची आई कामावरून  घरी परत आली त्यावेळी घराला आतून कडी लावलेली होती. दरवाजा उघडला, त्यावेळी घरात मुलगी आणि आरोपी होता. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याचे सांगितले. हरी गोविंद राठोड या आरोपीविरूगद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Four incidents of rape were reported in Sangwi police station area, Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.