कॅनडाच्या विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

By नारायण बडगुजर | Published: July 16, 2022 04:54 PM2022-07-16T16:54:59+5:302022-07-16T16:56:45+5:30

पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

Fraud on the pretext of gaining admission to a Canadian university | कॅनडाच्या विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

कॅनडाच्या विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

Next

पिंपरी :कॅनडा येथील विद्यापीठात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून तरुणाकडून १३ लाख २५ हजार रुपये घेतले. मात्र प्रवेश मिळवून दिला नाही. तसेच पैशांचा अपहार केला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार फेब्रुवारी २०२१ ते ७ जानेवारी २०२२ या कालावधीत खराळवाडी, पिंपरी येथे घडली.

दीपक रामधीरज यादव (वय ३१, रा. खराळवाडी, पिंपरी. मूळ रा. नाशिक) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. १५) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मनदीप सिंग (रा. उत्तराखंड), पंकज अग्रवाल (रा. कानपूर) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना कॅनडा येथील अलगोमा युनिव्हर्सिटी येथे प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी फिर्यादीकडून आरोपींनी १३ लाख २५ हजार रुपये घेऊन त्यांना अलगोमा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. फिर्यादीचा विश्वासघात करून त्यांनी दिलेले पैसे परत न देता फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूूद आहे.

Web Title: Fraud on the pretext of gaining admission to a Canadian university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.