विक्रीसाठी आणलेला ११ लाखांचा गुटखा जप्त; हिंजवडी पोलिसांनी केली दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 05:06 PM2021-02-25T17:06:29+5:302021-02-25T17:06:55+5:30

सुसगाव येथे तापकीर वस्तीमध्ये कारवाई

Gutka worth Rs 11 lakh seized who brught for sale; Hinjewadi police arrested the two | विक्रीसाठी आणलेला ११ लाखांचा गुटखा जप्त; हिंजवडी पोलिसांनी केली दोघांना अटक

विक्रीसाठी आणलेला ११ लाखांचा गुटखा जप्त; हिंजवडी पोलिसांनी केली दोघांना अटक

googlenewsNext

पिंपरी : गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना हिंजवडीपोलिसांनीअटक केली आहे. त्यांच्याकडून ११ लाख एक हजार ९२० रुपयांचा गुटखा तसेच दोन वाहने आणि मोबाईल फोन असा एकूण २४ लाख १७ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तापकीर वस्ती, सुसगाव येथे बुधवारी (दि. २४) ही कारवाई करण्यात आली.  

छोटूराम रत्नाराम देवासी (वय २२, रा. कोथरूड. मूळ रा. राजस्थान), रामदेव रत्नाराम सोडा (वय २४, रा. बाणेर, मूळ रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक कुणाल शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांना माहिती मिळाली की, तापकीरवस्ती येथे दोन वाहने थांबली असून गुटखा विक्री होत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोन्ही वाहनांसह आरोपी छोटूराम आणि रामदेव यांना ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुटखा विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले. आरोपींकडून ११ लाख एक हजार ९२० रुपयांचा गुटखा, १३ लाख १६ हजार रुपये किमीतच्या दोन गाड्या आणि मोबाईल फोन, असा एकूण २४ लाख १७ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, उपनिरीक्षक आर. एस. मुदळ, पोलीस कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, बंडू मारणे, कुणाल शिंदे, आतिक शेख, हणमंत कुंभार, सुभाष गुरव, श्रीकांत चव्हाण, दत्ता शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Gutka worth Rs 11 lakh seized who brught for sale; Hinjewadi police arrested the two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.