टाकवे बुदु्रक : आंदरमावळात रविवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट पाऊस पडल्याने अनेकांची धावपळ झाली. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांनी धांदल उडाली. पावसामुळे बाजरी, काकडी, कांदा, टोमॅटो, फरस बी, बाजरी, आंबा या पिकांचे नुकसान झाले. टाकवे बुद्रुक, फळणे, माऊ, वडेश्वर, कोंडिवडे, भोयरे, कशाळ, निगडे, कल्हाट भागात वादळी वाऱ्यासह पावसाने दुपारी हजेरी लावली. मात्र अचानक झालेल्या वादळी पावसाने अनेकांची धांदल उडाली असून, जनावरांचा चारा, वीटभट्टी झाकण्यासाठी कामगारांची धावपळ सुरू झाली. पावसात झाडावरील आंबे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. वादळी पावसामुळे वीज गायब झाली. रात्री उशिरापर्यंत काही भागात वीज नव्हती. त्यामुळे रात्र अंधारात काढावी लागली. पावसात लहान मुलांनी भिजण्याचा आनंद लुटला. गारा वेचण्यासाठी चिमुकल्यांची लगबग सुरू होती. (वार्ताहर)
मावळात जोरदार गारपीट
By admin | Published: May 09, 2016 12:29 AM