एकजुटीने पक्षाची ताकत वाढवा - चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:06 AM2018-05-08T03:06:28+5:302018-05-08T03:06:28+5:30

लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीतील सर्व आघाड्यांनी तसेच महिला आघाडीने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे़ पक्षाची ताकद वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.

 Increase the power of the party by uniting it - Chitra Tiger | एकजुटीने पक्षाची ताकत वाढवा - चित्रा वाघ

एकजुटीने पक्षाची ताकत वाढवा - चित्रा वाघ

googlenewsNext

पिंपरी : लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीतील सर्व आघाड्यांनी तसेच महिला आघाडीने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे़ पक्षाची ताकद वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.
पुण्यातून राज्यसभेच्या खासदारपदी वंदना चव्हाण यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा महिला आघाडीच्या वतीने चव्हाण यांचा चित्रा वाघ यांच्या हस्ते चिंचवड येथे जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी राष्टÑवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी महापौर अनिता फरांदे व ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम, अपर्णा डोके आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात वैशाली काळभोर म्हणाल्या, महापालिका निवडणुकीत फसवी जाहिरात करून भाजपाने सत्ता काबिज केली. केंद्र-राज्यातील भाजपा सरकारच्या चार वर्षाच्या कालावधीत महागाई, भ्रष्टाचार, जातीयवाद बोकाळला आहे. शहरातील नागरिकांनादेखील आता आपली ‘भूल’ कळली आहे.’’
वैशाली काळभोर यांनी स्वागत केले़ तर शिल्पा बिडकर यांनी सूत्रसंचालन केले़ मनीषा गटकळ यांनी आभार मानले. मनीषा भिलारे, गंगाताई धेंडे, वंदना पिंपळे, आदींनी संयोजनात सहभाग घेतला.

-खासदार चव्हाण म्हणाल्या, ‘‘महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली की घरातूनसुद्धा हळूहळू मदत मिळू लागते. त्यासाठी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. अनेक महिला शासकीय सेवेत किंवा राजकीय क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत. कुटुंबीयांचा तसेच पवार साहेबांची दूरदृष्टी आणि पाठिंब्यामुळे मला राजकारणात येण्याची संधी मिळाली.’’
-शहराध्यक्ष वाघेरे म्हणाले, ‘‘स्माईल प्रकल्पाप्रमाणे पिंपरी-चिंचवडमधील महिलादेखील झोपडपट्टीतील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे.’’

Web Title:  Increase the power of the party by uniting it - Chitra Tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.