पिंपरी : मावळ तालुक्यातील वडिवळे धरणात २७.१८ , आंद्रा धरणात ८२ टक्के तर पवनाधरणात ५३.३९ टक्के पाणी साठा आहे. लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रात पाण्याचा वापर कमी झाला असून घरगुती वापर वाढला आहे. गेल्या वर्षीपेक्षा पवनाधरणात १५ टक्के पाणी साठा जास्त आहे.पवना धरणाचे शाखा अधिकारी ए.एम. गदवाल यांनी सांगितले, लॉकडाऊनमुळे औद्योगिक क्षेत्रातील पाण्याचा वापर कमी झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर वाढला आहे. पिपरी-चिंचवड मनपा तसेच तळेगाव, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड आदी भागात दररोज ९२५ दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. तसेच पवनाधरण ते रावेत पर्यतच्या ४० किलोमीटर अंतरावरील सर्व ग्रामपंचायतींना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. पाण्याचा साठा भरपूर असून उन्हाळ्यात देखील पाणी टंचाई भासणार नाही. आंद्रा धरणाचे अभियंता अनंता हांडे म्हणाले, धरणात ८२ टक्के पाण्याचा साठा आहे. या धरणातून देहू, आळंदी, तळेगाव ते तुळापूर पर्यत पाणी जाते. तळेगाव औद्योगिक क्षेत्रातही सध्या लॉकडाऊन पाणी कमी जाते. घरगुतीसाठी वापर वाढला आहे. वडिवळे धरणाचे शाखा अभियंता मनोहर खाडे म्हणाले धरणात २७.२८ टक्के पाणी साठा आहे. या धरनातून टाकवे, वडगाव, खडकाळा,कान्हे यासह १७ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. टाकवे एमआयडीसीत लॉकडाऊन मुळे वापर कमी झाला आहे.
लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याचा घरगुती वापर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 6:19 PM
गेल्या वर्षीपेक्षा पवनाधरणात १५ टक्के पाणीसाठा जास्त आहे.
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे शहरातील औद्योगिक क्षेत्रात पाण्याचा वापर कमी