वायसीएमच्या रुग्णवाहिका मोजताहेत शेवटची घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:33 AM2018-11-26T00:33:36+5:302018-11-26T00:34:06+5:30

रुग्णांची गैरसोय : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, रुग्णवाहिकांची झाली दुरवस्था; दुरुस्ती होणार कधी?

last element that is counting YCM Ambulance | वायसीएमच्या रुग्णवाहिका मोजताहेत शेवटची घटका

वायसीएमच्या रुग्णवाहिका मोजताहेत शेवटची घटका

Next

पिंपरी : गरीब व गरजू रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या रुग्णवाहिका शेवटच्या घटका मोजत आहेत. रुग्णवाहिकांमधील औषधोपचार पेटीची दुरवस्था, खराब झालेले दरवाजे, गंज लागलेला पत्र्याचा साठा, तुटलेल्या अवस्थेतील वायपर, सायरन, आॅक्सिजन किटचा अभाव अशा परिस्थितीत रुग्णांची ने-आण केली जात आहे. यामुळे, अत्यावश्यक रुग्ण नेताना रुग्णांचे नातेवाईक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.


पिंपरी शहरातील वायसीएम रुग्णालयात खेड, मावळ, जुन्नर येथूनही अपघातग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात येते. परंतु, या रुग्णालयातील रुग्णवाहिकांची संख्या केवळ १० ते १२ असून, यामधील फक्त चार रुग्णवाहिका सुस्थितीत आहेत. या रुग्णालयाचा आवाका पाहता या ठिकाणी वीसहून अधिक रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. तसेच, ही वाहने महिनाभर धुतली जात नसल्याने रुग्णवाहिकेत दुर्गंधी पसरलेली आहे. महापालिका विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करते.

अत्याधुनिक रुग्णवाहिकांची आवश्यकता
रुग्णवाहिकांमधून रात्री-अपरात्री रुग्ण नेले जात असल्याने सायरन, वायपर, औषधोपचार पेटी, उत्तम दर्जाचे सीट, चांगल्या प्रकारचे स्ट्रेचर उपलब्ध असणे आवश्यक आहे. वायसीएममधील सर्व रुग्णवाहिका जुन्यातील असून, एकही रुग्णवाहिका अत्याधुनिक नाही. यामुळे, एखाद्या रुग्णाला अत्यावश्यक स्थितीत आणताना मोठी कसरत करावी लागत आहे.

Web Title: last element that is counting YCM Ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.