प्रेयसीचा गळा आवळून लातूरच्या प्रियकराचा गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:41 AM2018-11-29T01:41:55+5:302018-11-29T01:41:58+5:30

शहरात खळबळ : सांगवीच्या औंध सर्वोपचार रुग्णालय कर्मचारी वसाहतीतील प्रकार

Latur's lover hang himself after kill girlfriend | प्रेयसीचा गळा आवळून लातूरच्या प्रियकराचा गळफास

प्रेयसीचा गळा आवळून लातूरच्या प्रियकराचा गळफास

Next

पिंपरी : औंध सर्वोपचार रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीत मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास आदिती श्यामसुंदर बिडवे (वय १९) या तरुणीचा लातूरहून भेटण्यास आलेल्या तरुणाने वायरने गळा आवळून खून केला. या घटनेनंतर त्याने ओढणीच्या साह्याने स्वत:ही गळफास घेतला. तरुणीशी असलेल्या प्रेमसंबंंधातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. नईमोदीन बिल्कोसोद्दीन शहा (वय २१, रा. मूळचा लातूर) असे आरोपीचे नाव आहे. प्रेयसीचा खून केल्यानंतर त्याने स्वत:लाही संपविले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी वसाहतीत खोली क्रमांक २०४, टाइप बी इमारतीत राहणारे आदितीचे चुलते, चुलती हे दिवाळी सुटीत गावी गेले आहेत. आदिती आणि तिचा भाऊ शिक्षणासाठी पुण्यात आले असल्याने ते चुलत्यांकडे राहतात. आदितीचा सख्खा भाऊ पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. परीक्षा असल्याने तो सकाळी घराबाहेर पडला होता. तर चुलत भाऊ अभिनय हा दुचाकी सर्व्हिसिंगसाठी बाहेर गेला होता. घरात आदिती एकटीच होती. तिला भेटण्यासाठी लातूरहून नईमोदीन आला होता. घरात ते दोघेच होते. त्यांच्यात काही कारणास्तव वाद झाला.


रागाच्या भरात आरोपी नईमोदीन याने घरात पडलेल्या इलेक्ट्रिक एक्टेन्शन बोर्डची वायर अदितीच्या गळ्याभोवती गुंडाळली. आदितीचा जीव गुदमरल्याने काही वेळातच आरोपी नईमोदीन याने घरातील ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुचाकी सर्व्हिसिंगला गेलेल्या अभिनवचे दुचाकीचे जॉब कार्ड घरी राहिले असल्याने तो परत घरी आला. घराचा दरवाजा बंद होता. त्याने छोट्या मुलाला घराच्या छताला असलेल्या एका चौकोनी खाच्यातून काही अंतर खाली सोडले. त्या मुलाला तरुण छताला लटकत असल्याचे दिसून आले. काही तरी अघटित घडले असल्याचा अंदाज आल्याने अभिनयने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. आत पाहिले तर बहीण आदितीसुद्धा मृतावस्थेत पडल्याचे त्याने पाहिले. याबाबत सांगवी पोलिसांना माहिती देण्यात आली.


पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गळफास घेतलेल्या तरुणाच्या खिशात आधार कार्ड आढळून आले़ त्यावरून तो लातूरचा असल्याचे स्पष्ट झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंध सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले.

२०४ क्रमांकाच्या खोलीत जोडीने आत्महत्येची तिसरी घटना
औंध सर्वोपचार रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीतील २०४ क्रमांकाच्या खोलीत जोडीने आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. प्रेमिका, प्रियकर अशा एका जोडीने आत्महत्या केल्याची पहिली घटना येथे घडली. त्यानंतर याच खोलीत बहीण, भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुसरी घटना घडली होती. त्यानंतर आता आदितीचा खून करून नईमोदीन याने आत्महत्या केल्याची घटना याच खोलीत घडली असल्याची माहिती एस़ व्ही़ गायकवाड, आऱ आऱ घनवट आणि ए. बी़ राठोड या पोलीस कर्मचाºयांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, श्रीकांत पाटील व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Latur's lover hang himself after kill girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.