कामशेत : मागील महिन्यात कान्हे फाटा हद्दीत जुना मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या एका भंगार दुकानाला आग लागली. त्यात भंगाराचे दुकान, गोदाम भस्मसात झाले होते. ते दुकान पुन्हा पूर्ववत झाले असून, याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी धुराचे लोट निघू लागले. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना पुन्हा आग लागली की काय असा समज झाला. मात्र ही दुकानाला आग नसून, महामार्गाच्या कडेला प्लॅस्टिक व रबरी टायर व वायुप्रदूषण करणारा इतर कचरा, त्यातील विविध धातू मिळवण्यासाठी जाळला जात होता हे निष्पन्न झाले. मात्र या धुराचा महामार्गावरील वाहनचालकांना मोठा त्रास होत होता. यातून अपघात घडण्याची शक्यता अनेकांकडून वर्तवली जात होती. महामार्गावरील अनधिकृत भंगार दुकानांमध्ये अशा प्रकारचा भंगार माल जाळण्याचे प्रकार सर्रास होत असून, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. यातून मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण तर होतेच आहे; शिवाय महामार्गावरील वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असून, मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भंगार दुकानातील कर्मचाºयांच्या दुर्लक्षाने अथवा इतर अन्य कारणांमुळे भंगार दुकानांना आग लागण्याच्या घटना नेहमीच घडतात. याचा परिणाम महामार्गावर तर होतोच, शिवाय स्थानिक वसाहतीत राहणाºया नागरिकांच्या जिवालाही धोका पोहचू शकतो, अशी भीती अनेकांकडून वर्तवली जात आहे. मात्र या व्यावसायिकांवर स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाचे निर्बंध नसल्याने मागील काही वर्षांपासून महामार्गाच्या कडेला मोकळ्या जागेत अनधिकृतपणे भंगाराची अनेक दुकाने राजरोसपणे उभी राहिली आहेत. या दुकान अथवा गोदाम यांच्यात आग लागण्याची परिस्थिती आहे. महामार्गावर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.>वाहनचालक : डोळ्यांना होतोय त्रासराष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अनेक भंगार व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंसह प्लॅस्टिक, रबर, टायर यांच्यासह अनेक ज्वालाग्राही व ज्वलनशील पदार्थ साठवलेले असतात. अशा वस्तूंची ही गोदामे खचाखच भरलेली असतात. यातच लोखंडी सामान गॅस कटरच्या साहाय्याने तोडणे, तांब्या-पितळेच्या तारांसाठी प्लॅस्टिक वायरी महामार्गाच्या कडेला जाळणे आदी उद्योग सुरू असतात. यातून निघणाºया धुरामुळे महामार्गावरील वाहतुकीस मोठा त्रास होत असून, दुचाकीस्वारांना डोळे चोळत वाहन चालवावे लागत आहे.
महामार्गावर प्लॅस्टिक कच-याचा धूर, प्रदूषण वाढल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 1:29 AM