धुक्यात हारवला राष्ट्रीय महामार्ग; कामशेत, लोणावळा परिसरात सकाळच्या वेळी वाहतूक संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:37 AM2018-01-23T11:37:46+5:302018-01-23T11:39:33+5:30

धुक्याची लाट आल्याने या धुक्यात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग तसेच डोंगरालगतची गावे हारवली होती. मोठ्या प्रमाणात दाट धुके आल्याने महामार्गावर अवघ्या काही अंतरावरील देखील दिसत नसल्याने वाहनांचा वेग मंदावला होता.

Lost in the fog National Highway; traffic slow in the morning in ​​Kamsesh, Lonavla area | धुक्यात हारवला राष्ट्रीय महामार्ग; कामशेत, लोणावळा परिसरात सकाळच्या वेळी वाहतूक संथ

धुक्यात हारवला राष्ट्रीय महामार्ग; कामशेत, लोणावळा परिसरात सकाळच्या वेळी वाहतूक संथ

Next
ठळक मुद्देजुना मुंबई पुणे महामार्गासह द्रुतगती मार्गावर या धुक्याचा जाणवला चांगलाच प्रभाव नाणे, अंदर, पवन मावळासह कामशेत शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये धुक्याचा प्रभाव

लोणावळा/कामशेत : लोणावळा परिसरात आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणात धुक्याची लाट आल्याने या धुक्यात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग तसेच डोंगरालगतची गावे हारवली होती. मोठ्या प्रमाणात दाट धुके आल्याने महामार्गावर अवघ्या काही अंतरावरील देखील दिसत नसल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. वाहनांच्या लाईट लावत संथ गतीने वाहने मार्गक्रमण करत होती. धुक्यांमुळे गावे दिसेनाशी झाली होती. धुक्यासोबत थंडी देखिल वाढल्याने नागरिकांनी सूर्यनारायणाचे दर्शन होईपर्यत घरातच बसणे पसंत केले.
तर मागील काही दिवसा पासून मावळ तालुक्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला असून दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यात थंडी पेक्षा धुक्याची तीव्रता वाढत असल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. 
थंडी पूर्ण गायब झाली असताना व उन्हाचा तडाखा वाढला असताना अचानक दोन दिवसांपासून पुन्हा थंडीचे आगमन झाले आहे. त्यात मंगळवारी तर कामशेत व परिसरावर धुक्याने हल्लाबोल केला होता. या धुक्याची तीव्रता मोठी असल्याने समोरील पन्नास फुटावरील ही काही दिसत नव्हते. यामुळे अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली. 


जुना मुंबई पुणे महामार्गासह द्रुतगती मार्गावर या धुक्याचा चांगलाच प्रभाव जाणवला. दोन्ही मार्गावरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. महामार्गाच्या समोरील काही दिसत नसल्याने वाहन चालकांची मोठी दैना उडाली. 


याशिवाय नाणे, अंदर, पवन मावळासह कामशेत शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये धुक्याचा मोठा प्रभाव होता. या ठिकाणाहून सकाळी सकाळी नोकरदार वर्ग, विद्यार्थी, दुग्धव्यवसायिक व अन्य जणांना धुक्या मुळे कामशेत पर्यंत पोहचण्यास मोठा त्रास झाला. दुचाकीस्वारांचे धुक्याच्या काहूरामुळे कपडे ओले झाले. अचानक झालेल्या या धुक्याच्या हल्ल्यात नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. धुक्याचा प्रभाव सकाळी दहा वाजे पर्यंत कायम राहीला.

Web Title: Lost in the fog National Highway; traffic slow in the morning in ​​Kamsesh, Lonavla area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.