पिंपरी-चिंचवड (वाकड) : ज्या आयटी क्षेत्राने पु्ण्याचा सर्वच अंगाने चेहरामोहरा बदलून टाकला. पुण्याच्या लाईफस्टाईलच्या नवी व्याख्या निर्माण केली. त्या आयटी क्षेत्राची जाण्यासाठी आयटीएन्सला खूप मोठया समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आयटी पार्क हिंजवडी नगरीत जाणाऱ्या आयटी अभियंत्यांचा प्रवास अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतो. वाकड, याचे कारणे वेगवेगळी आहेत. मात्र, त्यात कित्येक दिवसांपासून आयटीएन्सला एक मोठा प्रश्न भेडसावत आहे. या प्रश्नाविषयी सातत्याने आवाज उठवून त्यांना न्याय न मिळाल्याची खंत त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. तो प्रश्न म्हणजे भूमकर वस्ती पुलाखाली साठणाऱ्या मैलामिश्रित पाण्याने आयटीयन्स प्रचंड वैतागली आहे. भुयारी मार्गात गेल्या अनेक वर्षांपासून मैलामिश्रित पाणी साठत असल्याने येथे वाहतुकीचा खेळ खंडोबा होतोच ऐन कंपनीत जाण्याच्या वेळेला हे पाणी अधिक प्रमाणात साठत असल्याने तब्बल अर्धा तास वाहतूक संथ होते तर या दुर्गंधीतुन वाट काढत आयटी अभियंते व कामगारांना आॅफिसला जावे लागत आहे. याशिवाय होणाऱ्या वाहतूक कोंडीला सामना वेगळाच या नित्याच्या गैरसोयीला सर्वजण कंटाळले आहेत वाहतूक पोलिसांच्या देखील समस्येने नाकात दम आणला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी आणि पाठपुरावा करून देखील त्यांच्याकडून नेहमी या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतावत असलेल्या या समस्येचे निराकरण महापालिका करणार तरी कधी असा संतप्त सवाल आयटीयन्स करीत आहेत. पावसाळ्यापूर्वी हे काम केल्यास येथील मोठी समस्या दूर होणार आहे. अन्यथा पावसाळ्यात येथे तब्बल तीन चार फूट पाणी जमते आणि किमान चार तास वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महापालिकेने पावसापूर्वी ही समस्या सोडवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अनेकदा तक्रारी करून उपयोग शून्य (दत्तात्रय पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी वाहतूक विभाग) ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे याबाबत तक्रार केल्यास तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते पुन्हा दोन महिन्यात तोच अनुभव पुन्हा येतो पावसाळ्यापूर्वी यावर कायमचा तोडगा काढावा अन्यथा वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागेल.
हिंजवडी आयटीत जाणाऱ्यांसाठी बिकट वहिवाट ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 1:28 PM
आयटी पार्क हिंजवडी नगरीत जाणाऱ्या आयटी अभियंत्यांचा प्रवास अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतो.
ठळक मुद्देभूमकर पुलाखाली साठतेय मैला मिश्रित पाणीअनेक वर्षांचा प्रश्न सुटणार तरी कधी असा आयटीयन्सचा संतप्त सवाल