मुलं होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पिंपरीच्या निगडीतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 07:08 PM2021-08-03T19:08:58+5:302021-08-03T19:09:22+5:30

पतीसह सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल

Marital harassment for not having children; The shocking type of Pimpri-Chinchwad | मुलं होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पिंपरीच्या निगडीतील धक्कादायक प्रकार

मुलं होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; पिंपरीच्या निगडीतील धक्कादायक प्रकार

googlenewsNext

पिंपरी : मुलं होत नसल्याच्या तसेच लग्नामध्ये व्यवस्थित मानपान केला नाही. या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याबाबत महिलेने सोमवारी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अब्दुल हमीद मौला पिरजादे (वय २८, रा. महाबू सुभाली दर्गा जवळ, विजापूर, कर्नाटक), दीर मोहम्मद हनीफ पिरजादे, सासू आणि नणंद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार २६ मे २०१५ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत विजापूर कर्नाटक येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेच्या लग्नानंतर घरातील लोकांनी आपसात संगणमत करून वेळोवेळी घरगुती कारणावरून तसेच लग्नामध्ये व्यवस्थित मानपान केला  नाही, या कारणावरून माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. पैसे आणण्यासाठी वारंवार दबाव देऊन लग्न चांगले करून दिले नाही, असे वारंवार सुनावले.

विवाहितेला मुलं होत नसल्याच्या कारणावरून मारहाण, शिवीगाळ करून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. लग्नामध्ये माहेरकडून स्त्रीधन म्हणून दिलेले सोन्या-चांदीचे दागिने परत न देता दागिन्यांचा आरोपींनी अपहार केला, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Marital harassment for not having children; The shocking type of Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.