जैन युवकांचे संमेलन, देशभरातील सातशे प्रतिनिधींचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:09 AM2018-10-06T02:09:48+5:302018-10-06T02:10:12+5:30

निगडी प्राधिकरण : देशभरातील सातशे प्रतिनिधींचा सहभाग

Meet of Jain youth, participation of seven hundred representatives across the country | जैन युवकांचे संमेलन, देशभरातील सातशे प्रतिनिधींचा सहभाग

जैन युवकांचे संमेलन, देशभरातील सातशे प्रतिनिधींचा सहभाग

Next

पिंपरी : निगडी प्राधिकरणातील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने अखिल भारतीय जैन सोशल आॅर्गनायझेशनच्या पाचव्या अखिल भारतीय जैन युवक संमेलनाचे आयोजन शनिवारी व रविवारी होणार आहे, अशी माहिती निमंत्रक नितीन बेदमुथा यांनी दिली आहे. निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवनात शनिवारी सकाळी नऊला संमेलनाचे उद्घाटन प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते होणार आहे.

स्वागताध्यक्ष पद मनोहरलाल लोढा भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योगपती राजेंद्र सांकला, प्रकाश पारख, विजयकांत कोठारी, पोपट ओस्तवाल, बाळासाहेब धोका, सुनील नहार, प्रा. अशोक पगारिया, सुरेश गादिया, मोहन संचेती, सुरेश शेठीया आणि जैन सोशल आॅर्गनायझेशनचे शहराध्यक्ष तुषार मुथा, कार्याध्यक्ष पवन लोढा आदी उपस्थित राहणार आहेत. पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त कोटा संघ प्रमुख प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब, प्रफुल्लाजीमहाराज, हंसाजीमहाराज, पुनितीजीमहाराज, गरिमाजीमहाराज, महिमाजीमहाराज यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम सुरु आहेत.
प्रतिभाकुंवरजीमहाराज यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी सकाळी नऊ वाजतापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुखलाल लोढा, मनोहरलाल लोढा, पवनकुमार लोढा, नितेशकुमार लोढा, पृथ्वीराज लोढा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमांना पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, रायगड, मुंबई येथूनही नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती संमेलनाचे निमंत्रक नितीन बेदमुथा यांनी दिली आहे.

संमेलनात अखिल भारतीय जैन सोशल आॅर्गनायझेशनचे देशभरातून पाचशे व राज्यातून दोनशे असे एकूण सातशे युवक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. उपस्थितांना संजय रावत (अहमदाबाद), राकेश जैन (इंदूर), कमल आचलिया (रायचूर) हे तज्ज्ञ सेवा, शिक्षा, संघटन; एक कदम गुरू दरबार की ओर; एक कदम जैनत्व की ओर; देशप्रेम भारतीय संस्कृती; उद्योग-धंद्यामध्ये प्रगती या विषयांवर मार्गदर्शन व्याख्यान देणार आहेत. तसेच या संमेलनात नवीन शाखा पदाधिकाऱ्यांचा शपथविधी, विशेष सेवाकार्य केलेल्या शाखांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
 

Web Title: Meet of Jain youth, participation of seven hundred representatives across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.