पैसा पैसा चित्रपटावर होतोय अन्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2016 06:20 AM2016-05-24T06:20:30+5:302016-05-24T11:50:30+5:30
सैराट या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर चार आठवड्याने म्हणजे 20 मे पासून पैसा पैसा हा चित्रपट प्रदर्शित झाला. सचित ...
ैराट या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर चार आठवड्याने म्हणजे 20 मे पासून पैसा पैसा हा चित्रपट प्रदर्शित झाला. सचित पाटील आणि स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट तिकीटबारीवर शुक्रवारपासूनच जोर धरत असताना, काही चित्रपटगृहातून शुक्रवारी पैसा पैसा चित्रपटाचे प्रसिद्धी फलक हटवण्यात आले आहेत. ही बाब निमार्ता शिवविलाश चौरसिया यांच्या निदर्शनास येताच. निर्मात्यांनी आपल्या सहकाºयांसह काल शनिवारी पुण्यात आणि आज रविवारी मुंबईत सर्व सिनेमागृहांना भेटी दिल्या. त्यांनाही प्रसिद्धी फलक सिनेमागृहात आढळून आले नाहीत. त्यांनी सिनेमागृहांच्या व्यवस्थापकांना विचारणा करताच, आहेत पण लावायचे राहून गेले....अशी थातुरमातूर उत्तर दिली गेली. तर काहींनी प्रसिद्धी फलक पोहोचले नसल्याचे खोटे सांगितले. शिवविलाश यांनी काही व्यवस्थापकांना हिसका देताच, गोडाऊनमध्ये टाकलेले पोस्टर्स, स्टॅण्डीज्, पुन्हा काढून लावण्यास काहींनी सुरूवात केली. तर काहींनी चुक कबूल करून निमार्ता शिवविलाश चौरसिया यांची माफी मागितली. हे सर्व घडत असताना उत्तर देताना व्यवस्थापक कुणाच्यातरी दबावाखाली आहेत, याची जाणीव निर्मात्यांना झाली. सिनेमाला दुपारी १२ वाजताची वेळ बहुतेक सिनेमागृहात मिळाली आहे आणि प्रयोगाची वेळ झाली तरी काही एकपडदा सिनेमागृहाच्या तिकीटबाºया उघडल्या नसल्याच्या तक्रारी निर्मात्यांकडे आल्याने, यात काहीतरी राजकारण होत असल्याचा संशय निमार्ता शिवविलाश चौरसिया यांना वाटत आहे. सैराट मुळे थिएटर मिळविण्यात आणि मिळूनही खेळ दाखविण्याची योग्य वेळ मिळण्यात असंख्य अडचणी आल्या तरीही पैसा पैसा प्रदर्शित करण्याचं धाडस शिवविलाश चौरसिया यांनी दाखविले. मराठी सिनेमांची गळचेपी होत असताना, चांगल्या सिनेमांचे पोस्टर्स गायब करण्याचा हा नवा फंडा काही विघ्नसंतोषी लोकांकडून सुरू झाला आहे. मराठी रसिकप्रेक्षकांसाठी, एका भैय्या माणसाने निर्मिती केलेल्या पैसा पैसा या चित्रपटाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे सिनेक्षेत्रातील काही धास्तावलेल्या मंडळीनी चित्रपट पाडण्यासाठी हे असले उद्योग चालवल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.