पिंपरी : पावसाचा जोर वाढल्याने पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. त्यामुळे शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांना पूर येऊ शकतो. त्यामुळे महापालिकेच्या वतीने आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून, अधिकाºयांनी नदी परिसराची पाहणी केली. तसेच प्रभागांतील अधिकाºयांना सूचना केल्या आहेत. दक्षता घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतून तीन नद्या वाहतात. मावळ आणि मुळशी परिसरात जोरदार पाऊस झाला की, शहरातील नद्यांना पूर येत असतो. मावळ आणि मुळशी भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पूरस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन केले आहे. ३२ प्रभागांनुसार महापालिकेने आपत्ती निवारण आरखडा तयार केला आहे. त्यानुसार स्थापत्य, पाणीपुरवठा, आरोग्य, जलनिस्सारण अशा विविध विभागांना सूचना केल्या आहेत. प्रभागनिहाय कक्ष २४ तास कार्यान्वित केले आहेत.आपत्ती निवारण कक्षाचे सहायक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर म्हणाले, ‘‘पूरस्थिती आणि आपत्ती निवारणासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांचीही मदत घेतली जाते. तसेच जीवरक्षकही, बोटीही सज्ज असणार आहेत. महापालिकेच्या वतीने आपत्ती निवारणासाठी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार विभागनिहाय जबाबदारी निश्चित करून काम सुरू झाले आहे. जलसंपदा आणि धरण क्षेत्रासाठी नियुक्त असणाºया अधिकाºयांशीही संवाद सुरू आहे. महापालिका भवनातही कक्ष निर्माण केला आहे. हा कक्ष २४ तास कार्यान्वित असेल. ज्या परिसरात नदीचे पाणी घुसते त्या परिसराची पाहणी केली आहे. त्यानंतर अधिकाºयांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. तसेच नागरिकांनाही सर्तक राहण्यास सांगण्यात आले आहे.कार्यालय दूरध्वनी मोबाइलमध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष ०२० - ६७३३१५५६अ क्षेत्रीय कार्यालय ०२० - २७६५६६२१ ९९२२५०१४५३ब क्षेत्रीय कार्यालय ०२०-२७३५०१५३ ९९२२५०१४५५क क्षेत्रीय कार्यालय ०२०-२७१२२९७९ ९९२२५०१४५७ड क्षेत्रीय कार्यालय ०२०-२७२७७८९८ ९९२२५०१४५९ई क्षेत्रीय कार्यालय ०२०-२७२३०४१०फ क्षेत्रीय कार्यालय ०२०-२७६५०३२४ ८६०५४२२८८८
नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 5:53 AM