शिवणे : श्री म्हसोबा सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने श्री म्हसोबा देवाचा उत्सव वाळुंजवाडी येथे झाला. त्यानिमित्त सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम झाला. हभप कुमार बाळकृष्णमहाराज डांगे यांच्या कीर्तनाने श्रोतावर्ग मंत्रमुग्ध झाला.राष्ट्रीय खेळाडू संपदा बुचडे, राष्ट्रीय खेळाडू श्रेया कंधारे, राष्ट्रीय कुस्तीपटू अपूर्वा शिंदे, राष्ट्रीय सुवर्णपदकविजेती अंकिता शिंदे, राष्ट्रीय खेळाडू संचिता भोईर व कराटे खेळाडू तृप्ती निंबळे यांना सन्मानचिन्ह देऊन सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले.शिवणेतील हभप विलासमहाराज दळवी यांना सांप्रदायिक वारकरीभूषण पुरस्कार, तर यशकल्याण, ग्रामीण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील यांना समाजभूषण पुरस्कार देऊन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे व मावळकेसरी खंडू वाळुंज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पवन मावळातील एकूण ६१ वारकऱ्यांचा देखील सन्मानचिन्ह देऊन सत्कार झाला. हभप विठोबा येवले यांनी संयोजकांचे आभार मानले.या वेळी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँगे्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, भरत शिंदे, जि. प. सदस्य गुलाबराव वरघडे, जयनाथ काटे, रमेश गायकवाड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, सखाराम गायकवाड, बाळासाहेब नेवाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख भारत ठाकूर, सरपंच मनोज येवले, वस्ताद गुलाब जाधव, दिलीप कांबळे, तळेगावच्या नगराध्यक्षा माया भेगडे, सरपंच राधिका वाळुंज, ज्ञानेश्वर दळवी, उपसरंपच दत्तात्रय ओझरकर, भरत गोते, दत्तात्रय बालवडकर, शंकर कंधारे आदी उपस्थित होते.सिंधूताई सपकाळ म्हणाल्या, ‘‘स्त्री शक्तीचा जागर करा. महिलांना कोठेही कमी लेखू नका. कोणत्याही पुरुषाच्या यशस्वी होण्यामागे एका स्त्रीचा हात असतो. यासारखे दाखले देताना सिंधूतार्इंच्या डोळ्यात अश्रू, तर कधी मुखातून हसू बाहेर पहावयास मिळाले.’’ तासाभराच्या कालावधीत मार्इंनी उपस्थित सर्व श्रोत्यांबरोबर जवळून विचारमंथन केले.भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. मावळकेसरी खंडू वाळुंज यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र शिंदे यांनी आभार मानले.कुस्ती आखाडास फाटा देऊन दुष्कालग्रस्थांसाठी निधीदेहूरोड : सांगवडेतील ग्रामदैवत भैरवनाथ भंडारा उत्सवानिमित्त अभिषेक, महापूजा, छबिना, पालखी मिरवणूक, विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रम झाले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा व खेळाडूंचा सांगवडेगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कुस्त्यांच्या आखाड्याला फाटा देऊन दुष्काळग्रस्तांसाठी निधी देण्यात आला.उत्सवानिमित्त सकाळी श्रींचा अभिषेक, महापूजा करण्यात आली. सायंकाळी गावातून ढोल-ताशाच्या गजरात व भजन दिंडीद्वारे छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री मनोरंजनासाठी शाहीर बाळासाहेब काळजे यांचा ‘ही दौलत महाराष्ट्राची’ हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत कुस्त्यांचा आखाडा रद्द करून गावातून जमा केलेल्या लोकवर्गणीतून २५ हजार रुपयांचा व दानपेटीच्या माध्यमातून जमा झालेला निधी नाम फाउंडेशनला हभप जीवन खाणेकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर, देवराम भेगडे, प्रवीण राक्षे (पोलीस उपनिरीक्षक), ज्ञानेश्वर राक्षे (वन अधिकारी), नागेश राक्षे (मावळ केसरी), अमोल राक्षे (मावळकेसरी), सायली राक्षे (कबड्डी), दीप्ती लिमण (धावपटू), गणेश लिमण यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माजी सरपंच सुरेश राक्षे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
वाळुंजवाडीत राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
By admin | Published: May 09, 2016 12:26 AM