वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी वडगाव मावळ येथे मुबंई-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़राज्य सरकारने कर्ज माफी जाहीर करून तीन महिने उलटून गेले तरी अद्यापही शेतकºयांना कर्जमाफी दिली गेली नाही़ शेतकºयांना खर्चाच्या ५० टक्के अधिक हमीभाव देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यातही सरकारने शेतकºयांची घोर निराशा केली़ गॅस सिलिंडर स्वस्त करू अशी अनेक वेळा सरकारने फसवी आश्वासने दिली आहेत़ तसेच पेट्रोल व डिझेलच्या दरातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मराठा आरक्षण, शेतकरी संप, धनगर आरक्षण, बालवाडी सेविका यांच्या समस्या सोडविण्यात सरकार अपयशी झाले आहे. मावळातील पवना गोळीबार प्रकरणातील शेतकाºयांवरील गुन्हे अद्याप मागे घेण्यात आले नाहीत़ ते त्वरित मागे घेण्यात यावीत आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भाजपा सरकारविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपा सरकारच्या विरोधात भाषणे केली. माजी मंत्री मदन बाफना, विवेक वळसे पाटील, बाळासाहेब नेवाळे, गणेश ढोरे, वैशाली नागवडे, अर्चना घारे, किशोर भेगडे, विठ्ठल शिंदे, सुभाष जाधव, मंगेश ढोरे, विजय काळोखे, गणेश काकडे , कुसुम काशीकर, शुभांगी राक्षे, शोभा कदम, गंगा कोकरे , शीतल हागवणे, सुनीता काळोखे, रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.पोटोबामहाराज मंदिरापासून सुरू झालेल्या मोर्चात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या वेळी सुमारे पंधरा मिनिटे रास्ता रोको आंदोलन केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन, सरकार विरोधात घोषणा; तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 3:00 AM