जुन्या नोटा बाळगणारे तीन जण गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 02:57 PM2017-07-29T14:57:37+5:302017-07-29T14:57:37+5:30
जुन्या नोटा बाळगणा-या तीन जणांना देहुरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देहुरोड उपविभागीय पोलीस अधिकारी जी.एस. माडगूळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या नोटा बदलण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले होते.
पिंपरी, दि. 29 - जुन्या नोटा बाळगणा-या तीन जणांना देहुरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देहुरोड उपविभागीय पोलीस अधिकारी जी.एस. माडगूळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या नोटा बदलण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, ते शक्य झाले नाही. गौरव भगवानदास अगरवाल (खराळवाडी- पिंपरी), निविंदु घनशाम गोयल (पिंपळेगुरव), दिलीप सत्यनारायण गुप्ता अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. हे तिघं जण मोटारीतून नोटा घेऊन जात असताना पोलिसांनी मुद्देमालासहीत त्यांना ताब्यात घेतले. सुमारे 2 कोटी 90 लाख रुपयांच्या जुन्या नोटा या तिघांकडून ताब्यात घेण्यात आल्या.
मोटारीतून जुन्या नोटा नेण्यात येत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथक व अधीक्षकांचे पथक यांना मिळाली. याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. परंतु, तोपर्यंत गाडी लोणावळ्यावरून पुढे निघाली होती. यानंतर पोलिसांनी एमएच 14, सीके 400 या क्रमांकाच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, पुणे एसपी ऑफिसमधील पथकानं उर्से येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
लोणावळ्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव एटीएस पथकाचे सहा्यक निरीक्षक अर्जुन मोहिते, ग्रामीण एटीएसचे घोगुरकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. प्राप्तिकर विभागाला याची माहिती देण्यात आली आहे