जुना पुणे-मुंबई महामार्ग : कामशेत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात, पवनानगर फाटा ४ महिने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 03:16 AM2018-02-03T03:16:15+5:302018-02-03T03:17:56+5:30

येथील जुन्या मुंबई-पुणे या महामार्गावरील पवनानगर फाटा येथे मागील एक वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला असून, गुरुवारी रात्रीपासून महामार्गावरील पवनानगर फाटा हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Old Pune-Mumbai highway: commencement of Kamshit flyover, Pawananagar fata closed for 4 months | जुना पुणे-मुंबई महामार्ग : कामशेत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात, पवनानगर फाटा ४ महिने बंद

जुना पुणे-मुंबई महामार्ग : कामशेत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात, पवनानगर फाटा ४ महिने बंद

Next

कामशेत - येथील जुन्या मुंबई-पुणे या महामार्गावरील पवनानगर फाटा येथे मागील एक वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला असून, गुरुवारी रात्रीपासून महामार्गावरील पवनानगर फाटा हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पवनानगर भागातून व महामार्गाचे पलीकडून येणारा नोकरदार वर्ग, दुग्धव्यावसायिक, विद्यार्थी व नागरिक यांची चांगलीच तारांबळ उडाली. मार्ग बदलल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र आता उड्डाणपूल लवकरच होणार यामुळे अनेकांनी सुस्कारा सोडला.
जुन्या मुंबई-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील कामशेतमधील पवना फाटा हा अतिशय धोकादायक व अपघात प्रवण क्षेत्र झाल्याने हा महामार्ग ओलांडताना अनेकांच्या मनात धडकी भरत होती. हा महामार्ग ओलांडताना आजतागायत अनेकांचे बळी गेले आहेत. येथे होणाºया मोठ्या प्रमाणातील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. महामार्गावरून वेगात येणाºया वाहनांचा अंदाज येत नसल्याने मोठं मोठे अपघात झाले आहेत. महामार्गाच्या पलीकडे असणारी पवनानगरपर्यंतची व आजूबाजूची गावे तसेच महामार्गा पलीकडील शहरातील गणेशवाडी, गरुड कॉलनी, पंचशील कॉलनी, इंद्रायणी कॉलनी, दौंडे कॉलनी, कुसगाव व इतर अनेक वसाहती आदी ठिकाणी राहणाºया नागरिकांचा हा नित्याचा मार्ग आहे. लहान मुलांना शाळेत सोडविणे, वयोवृद्धांना बँकेत दवाखान्यात जाणे, महिला व नोकरदारवर्ग या सर्वांनाच जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागतो.
त्यामुळेच मागील अनेक वर्षांपासून येथे उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग व्हावा अशी नागरिकांची मागणी होती. यासाठी सर्व राजकीय पक्ष, पुढारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सह नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली. संबंधित प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी ही केली. यातूनच मागील वर्षी जानेवारी महिन्यात येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. यात सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र काम सुरू असताना अचानक काही महिने काम रेंगाळल्याने हा उड्डाणपूल होणार की नाही असा ग्रामस्थ व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यातूनच हे काम बंद झाल्याच्या अफवा ही उठल्या होत्या. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून या कामाला गती मिळाली असून, उड्डाणपुलाच्या कामासाठी महामार्गाच्या कडेची अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू झाले. यात बरेच टपरीधारक व पक्की बांधकामे तोडण्यात आली.

अतिक्रमणे हटविणार
येत्या पंधरा दिवसांमध्ये महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व सुरक्षेच्या नियमानुसार सेवा रस्त्याचे काम या आधीच पूर्ण झाले असून लगेचच उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. हे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती येथील अधिकाºयांनी दिली.
वाहतुकीत बदल
४या उड्डाणपुलाच्या कामाची मुदत ३१ मे २०१८ पर्यंतची असून, त्याआधीच हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. या कालावधीत पवनानगर फाटा हा सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला असून, वाहतुकीचा मार्ग दोन्ही बाजूने वळवण्यात आला आहे. तरी नागरिक व वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रकल्प समन्वयक प्रवीण तायडे यांनी केले.

मुंबई-पुणे लेनच्या सेवा रस्त्याच्या कडेला कामशेत पोलिसांसाठी चेकपोस्ट उभारले. तर गुरुवारी रात्री उशिरा पवनानगर फाटा वाहतुकीसाठी पूर्ण पणे बंद करून दोन्ही बाजूची वाहतूक वळवण्यात आली. येथे लाकडे रोवून त्यावर पत्रे लावून हा मार्ग पूर्ण पणे बंद केला.
शुक्रवारी अचानक सकाळी अनेकांचा गोंधळ उडाला. महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून पुढे सुमारे ३०० मीटर अंतराने रस्ता वळवल्याने अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. मात्र आता लवकरच या ठिकाणी उड्डाणपूल तयार होणार असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.
 

Web Title: Old Pune-Mumbai highway: commencement of Kamshit flyover, Pawananagar fata closed for 4 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.