नदीच्या पुरामुळे रोगराई पसरू नये, पिंपरी आयुक्तांचे दक्षतेचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 09:12 PM2019-08-08T21:12:34+5:302019-08-08T21:14:06+5:30
गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्याना पूर आला आहे.
पिंपरी : मुळा आणि पवना नदीचा पूर ओसरला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना नागरि सुविधा मिळाव्यात, याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थापत्य, पाणीपुरवठा, आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. रोगराई पसरू नये, याबाबत दक्षतेचे आदेश आयुक्तांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत. वेधशाळेने रेड अलर्ट जारी केल्याने पूरनियंत्रणासाठी सज्ज रहावे, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने शहर आणि मावळ, मुळशी भागातील धरणे फुल झाली आहे. त्यामुळे पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्याना पूर आला आहे. त्यामुळे सात हजार नागरिकांना स्थलांतरित केले होते. पूर ओसरल्याने याबाबतचा आढावा घेण्यासाठी महापालिकेत बैठक झाली. यावेळी कार्यकारी अभियंते उपस्थित होते. पूराचे पाणी ज्या भागात घुसले होते. त्या भागातील पाणी ओसरल्याने निसरडे झालेले रस्ते साफ करावेत, आरोग्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही, याबाबत धुरीकरण करावे, अशा सूचनाही करण्यात आल्या.
.......................
आपत्कालीन विभाग संपर्क क्रमांकअ प्रभाग- 8888844210ब प्रभाग- 7722060926क प्रभाग- 9922501942ड प्रभाग- 9112272555ई प्रभाग- 9822012687फ प्रभाग- 9922501288ग प्रभाग- 7887893077ह प्रभाग- 7887893045आपत्ती विभाग- 8888844210
....
हाय अलर्टमुळे दक्षता महापालिका भवन आणि प्रभागस्तरांवर पूरनियंत्रणकक्षही सुरू आहे. महापालिका परिसरातील पूरस्थितीमध्ये नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना मदत करण्यासाठी यंत्रणा सज्ज असून नदी घाटांवर सुरक्षारक्षक तैनात आहेत. दापोडी, पिंपरी, सांगवीतही संक्रमण शिबिराच्या जागा निश्चित केल्या आहेत. पवना धरण, आपत्तकालीन विभाग, अधिकारी असा समन्वय साधला जाणार आहे. या विभागात चोविस तास कर्मचारी तैनात राहणार आहेत. सिंचन विभाग, धरण, हवामान खाते यांच्याशी संवाद आणि संपर्क साधण्यासाठी सूचना केल्या आहेत. वेध शाळेने आणखी दोन दिवस अतिपर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पूरनियंत्रण कक्षाला सज्जतेच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत अधिकाºयांचा व्हॉटस् अ?ॅप ग्रुपही कार्यरत आहे. .
........................................
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पात्रातील पूर ओसरला आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणात आली आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर राहणार असल्याने आपत्तकालीन विभागास सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पूराचे पाणी ओसरल्याने पूरपरिस्थती असणाºया भागात स्वच्छता, आरोग्यविषयक कामे सुरू आहेत.ह्णह्ण