पिंपरी : महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदावरून भाजपामध्ये गटबाजी सुरू आहे. या नाराज गटाला आपलेसे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक गुप्त मतदानाने घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्यावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. सात मार्चला होणाºया निवडणुकीत बंडोबांना रोखण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप अशा दोन गटांत सत्तासंघर्ष सुरू आहे. चिंचवडला अध्यक्षपद मिळाल्याने भोसरीतील भाजपात नाराजीचा सूर होता. त्यामुळे नाराजीचा फायदा उठवीत विरोधी पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोरेश्वर भोंडवे यांना रिंगणात उतरविले. भोंडवेंचा अर्ज भरण्यासाठी विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले आदी उपस्थित होते.महापालिका स्थायी समितीत अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करून घेतली जाते. भाजपाच्या फुटीचा फायदा घेण्यासाठी भोंडवे यांनी ही निवडणूक गुप्त पद्धतीने घेण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. भोंडवे म्हणाले, ‘‘लोकशाहीत मतदानपद्धती गुप्त पद्धतीने असते. स्थायी समितीत आता हात वर करून मतदान करायचे. मग सदस्यांचे मत गुप्त कसे राहणार? यासाठी ही पद्धत बदलण्यात यावी, अशी मागणी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे केली आहे.’’शिवसेनेचा पाठिंंबामहापालिका स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि शिवसेनेचे एक असे विरोधी पक्षाचे पाच सदस्य आहेत. एक सदस्य असलेल्या शिवसेनेने राष्ट्रदीच्या उमेदवारास पाठिंबा दर्शविला आहे. तसेच भाजपातील असंतुष्टांना आपल्याकडे ओढण्यासाठी भोंडवे यांनी व्यूहरचना केली आहे. भाजपाचा गट फोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.भाजपात अस्वस्थतामहापालिकेत सत्ता असतानाही स्थायी समिती अध्यक्षपदावरून राजकारण सुरू झाल्याने भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. बुधवारी निवडणूकहोणार असल्याने गोंधळ होऊ नये, याची दक्षता सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांकडून घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांचे व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत.
स्थायी अध्यक्ष निवड : भाजपातील वादाला फोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 3:31 AM