महापालिकेच्या जागा दिल्या भाड्याने, राहुल जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:30 AM2018-08-17T00:30:32+5:302018-08-17T00:31:22+5:30
महापालिकेच्या वतीने विविध आरक्षणांच्या जागा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, त्यास कुंपन घातले नसल्याने महापालिकेच्या जागा काहींनी भाड्याने दिल्या आहेत.
पिंपरी - महापालिकेच्या वतीने विविध आरक्षणांच्या जागा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, त्यास कुंपन घातले नसल्याने महापालिकेच्या जागा काहींनी भाड्याने दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेकडे ताब्यात आलेल्या जागांना कंपने घाला, महिनाभरातच कुंपन घालून फलक लावावेत, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी स्थापत्य विभागास दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध आरक्षणांच्या जागा कागदोपत्री ताब्यात घेतल्या आहेत. त्या जागा संरक्षित न केल्याने त्या जागांचा वापर परिसरातील दादा करीत आहेत. महापालिकेच्या जागेचे भाडे वसूल केले जात आहे. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे, ही बाब महापौरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महापौर दालनात आज आढावा घेतला.
शहर अभियंता अंबादास
चव्हाण व नगररचना विभागातील संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केली. किती जागा महापालिकेच्या ताब्यात आहेत, माहितीही मागविली. किती जागांना कुंपन घातले आहे. याची माहिती विचारली असता प्रशासनाचे अधिकारी निरूत्तर झाले. त्यावर ही बाब योग्य नाही, असे महापौर म्हणाले.
महापौर जाधव म्हणाले, ‘‘महापालिकेने विविध रस्ते,
शाळा, रुग्णालये अशा विकास कामांसाठी आरक्षित केलेल्या ज्या जागा महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत.’’